Taj Resort & Convention Centre |Goa |Goa Hotel Dainik Gomantak
गोवा

गोव्यात सहावे 'ताज', 17 एकरमध्ये 300 कोटी खर्चून उभारले जाणार अलिशान हॉटेल

Taj Hotel Goa: गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने यासाठीची मोकळी जागा एप्रिल २०२४ मध्ये कंपनीला हस्तांतरित केलीय.

Pramod Yadav

हणजूण: उत्तर गोव्यातील हणजूण येथे भव्य ताज हॉटेल उभारले जाणार आहे. हॉटेलचे बांधकाम पुढील महिन्यात सुरु होणार असून ते सप्टेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. १७ एकर परिसरात विस्तारणाऱ्या या हॉटेलसाठी तीनशे कोटींचा खर्च होणार आहे. राज्यातील हे सहावे ताज हॉटेल असेल.

भारत रिएल्टी वेन्चुअर प्रा. लि. कंपनीने दोन ऑगस्ट रोजी याबाबत माहिती देत, हॉटेलचे काम सप्टेंबर २०२४ पासून सुरु होणार असल्याचे स्पष्ट केले. गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने यासाठीची मोकळी जागा एप्रिल २०२४ मध्ये कंपनीला हस्तांतरित केलीय.

टाटा ब्रँड अंतर्गत कार्यरत भारत रिएल्टी कंपनीने भारतीय हॉटेल्स कंपनी लिमिटेडसोबत या नव्याने होणाऱ्या हॉटेलच्या व्यवस्थापनाबाबचा करार केल्याचे समजते. गोवा सरकारच्या पर्यटन विकास महामंडळासोबत साठ वर्षांची लीझ डिड केल्याचे भारत रिएल्टी कंपनीने म्हटले आहे.

हॉटेलच्या बांधकामाचा सर्व खर्च भारत रिअल्टी वेन्चुअर प्रा. लि. कंपनीने करायचा आहे. तर, कंपनीने जीटीडीसीला ३५ कोटी रुपयांची अपफ्रंट फी जमा केलीय.

हॉटेल परिसरातून अरबी समुद्राचा मनमोहक व्ह्यु दिसतो. मोठे खुले मैदान असल्याने याठिकाणी लग्न, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करता येतील, असे कंपनीने म्हटले आहे.

गोव्याच्या रिएल इस्टेट मार्केटमध्ये वाढ

गोव्याच्या रिएल इस्टेट मार्केटमध्ये वाढ होताना दिसत आहे. अलिकडेच दिल्लीतील डीएलएफ कंपनीने राज्यात ६२ अलिशान व्हिालाचे लॉन्चिग केले आहे. या व्हिलांची किंमत ४० ते ५० कोटीच्या घरात आहे. पणजीजवळील रेईश मागुश येथील टेकडीवर डीएलएफचा हा प्रकल्प आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मतचोरी करून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न" प्रियांका गांधी-वद्रा यांची 'NDA'वर टीका; 65 लाख नावे वगळल्याचा आरोप

Department of Animal Husbandry: पशुसंवर्धन खाते प्रमुखांविना ठप्प, कामधेनू सुधारित योजनेसह अनेक योजना प्रभावित

Goa Today's News Live: बांबोळीत पुन्हा अपघात, दुभाजकाला धडकली बस

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन'! गुरुवारी 'या' 3 राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार, परिश्रमाचे उत्तम फळ मिळणार

Night Vigil App: तंत्रज्ञानामुळे रात्रीची सुरक्षा होणार अधिक सक्षम, विद्यार्थ्यांनी बनवलेले 'नाईट व्हिजिल' ॲप पोलिसांसाठी नवे हत्‍यार

SCROLL FOR NEXT