Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: 'मोपा'वर मुंबईतील वकिलाच्या बॅगेत सापडली सहा जीवंत काडतुसे

Mopa Airport: वांद्रे (पूर्व) येथील रहिवासी असणारे उदय दळवी गोव्यातून मुंबईला जात होते.

Pramod Yadav

Mopa Airport

उत्तर गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी (दि. १४) मुंबईतील गौरव उदय दळवी या प्रवाशाच्या बॅगेत सहा जीवंत काडतुसे सापडली. याप्रकरणी गौरवला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी मोपा विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या गौरवचे 'स्क्रिनिंग' केले असता त्याच्या बॅगेत काडतुसे असल्याचे स्पष्ट झाले. त्याला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती वकील असून त्याच्या वडिलांकडे पिस्तूल वापरण्याचा परवाना आहे. मुंबईहून विमानाने येताना त्याने चुकून ही बॅग आणली होती.

वांद्रे (पूर्व) येथील रहिवासी असणारे उदय दळवी गोव्यातून मुंबईला जात होते. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांची बॅग तपासण्यात आली असता, त्यात सहा जीवंत काडतुसे सापडली.

दळवी यांच्याकडे काडतुसांचा वैध शस्त्र परवाना नसल्याचे समोर आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मोपा पोलिस उपनिरीक्षक दीपळ हळर्णकर अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT