Land Grabbing Case Dainik Gomantak
गोवा

Land Grabbing Case : जमीन हडप प्रकरणी १४ जणांवर गुन्हा; एसआयटीची कारवाई

गत वर्षी एसआयटीकडे जमीन हडप केल्याची दिली होती तक्रार

दैनिक गोमन्तक डिजिटल

Anjuna Land Grabbing Case: हणजूण येथील सर्व्हे क्रमांक 444/8 चे बोगस दस्तावेज मामलेदार कार्यालयात सादर करून जमीन हडपल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) रोहन हरमलकर याच्‍यासह 14 जणांविरोधात आज गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास निरीक्षक सूरज सामंत करत आहेत.

कामुर्ली-बार्देश येथील आंतोनियो सावियो डिसोझा यांनी गत वर्षी एसआयटीकडे त्यांची जमीन हडपल्याची तक्रार दिली होती.

गुन्हा दाखल झालेल्यांत मॅथ्यू डिसोझा (मुंबई), देवानंद कवळेकर (पिळर्ण), पीटर वाझ (हणजूण), फेलिक्स नोरोन्हा (शापोरा), आकाश चौधरी व सीमा चौधरी (कर्नाल-हरयाणा), आल्क्रांतो डिसोझा, जी. डिसोझा, आर्चिबाल्ड डिसोझा, तेरेझा डिसोझा, मॅक्सी डिसोझा, टिना डिसोझा, वेरोनिका डिसोझा (सर्व रा. धुळेर), रोहन हरमलकर (तिसवाडी) यांचा समावेश आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT