Road Repairing  Dainik Gomantak
गोवा

Siolim Road Repairing: शिवोलीत अक्षरशः चाळण झालेल्या रस्त्यांची अखेर कामे सुरु

Siolim Road Repairing: आमदार दिलायला लोबो यांनी या भागातील रस्त्यांची कामे हाती घेऊन शिवोलीत रस्त्यांचे नवे जाळे निर्माण केले होते.

दैनिक गोमन्तक

Goa: शिवोली पंचक्रोशीतील अनेक रस्त्यांची मागच्या पावसाळ्यात धूप झाल्याने जागोजागी रस्त्यात खड्डे पडले होते, त्यामुळे शुक्रवारपासून शिवोली-चोपडे पुलावरील खड्डे बुजवण्याचे काम विशेष यंत्राच्या मदतीने सुरू होते.

तिळारी प्रकल्पाची नवी जलवाहिनी टाकण्यासाठी खोदण्यात आलेले खड्डे गेली तीन वर्षे तसेच पडून राहिल्याने शिवोली-हणजूण रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. यावर आमदार दिलायला लोबो यांनी या भागातील रस्त्यांची कामे हाती घेऊन सर्वप्रथम शिवोलीत रस्त्यांचे नवे जाळे निर्माण केले होते.

दरम्यान, यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे हणजूण तसेच शिवोली पुलावरील रस्त्यांची पुन्हा धूप झाल्याने वाहनचालकांसह स्थानिक ग्रामस्थांना खड्ड्यांमुळे त्रास सोसावा लागत होता. दरम्यान, पावसाळ्यात पेडणे-बार्देशला जोडणाऱ्या पुलावर जागोजागी खड्डे पडल्याने दोन्ही बाजूंकडील वाहनचालकांना वाहने हाकताना कसरत करावी लागत होती. इतकेच नव्हे तर येथील पुलावर खड्ड्यांमुळे अनेकांना जीवही गमवावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT