Primary Health Centre Siolim  Dainik Gomantak
गोवा

Siolim Health Centre: छताला गळती, धोकादायक भिंती, परिसरात दुर्गंधी; शिवोली आरोग्य केंद्रचं 'आजारी'

Siolim Primary Health Centre: आरोग्य केंद्रातील भिंतींवरही गळती व ओलसरणाच्या खुणा आहेत. दारे आणि खिडक्या देखील खराब झाले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : शिवोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्यानेच उद्घाटन केलेल्या विस्तारित ब्लॉकला गळती लागली आहे. परिणामी भिंती ओलसरपणाने झाकल्या आहेत. छताला गळती लागल्याने जुन्या ब्लॉकची स्थितीही चांगली नाही. तसेच संरक्षक भिंतीची अवस्था बिकट असून तातडीने दुरुस्तीची गरज आहे.

शिवोली आरोग्य केंद्राची इमारती १९८८ मध्ये बांधण्यात आली होती. जी शिवोली मार्ना, सडये, ओशेल, वेर्ला, काणका, गिरी, पर्रा, आसगाव, हणजूण व शापोरा येथील ग्रामस्थांसाठी होती.

वाढती लोकसंख्या व पर्यटकांच्या प्रवाहामळे सध्याच्या इमारतीत जागेची अडचण जाणवत होती आणि त्यामुळे स्थानिकांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आरोग्य केंद्रासाठी नवीन इमारतीची मागणी ग्रामस्थांनी सुरु केली.

त्यामुळे सध्याच्या इमारतीच्या मागील बाजूस नवीन विस्तारित ब्लॉक प्रस्तावित करण्यात आला. २००९मध्ये विस्तारीकरणाच्या ब्लॉकची पायाभरणी करण्यात आली होती. मात्र कंत्राटदाराने प्रकल्प सोडून दिल्याने शिल्लक कामासाठी पुन्हा निविदा काढणे यासह विविध कारणांमुळे संपूर्ण प्रकल्पाला १० वर्षांहून अधिक काळ विलंब झाला.

शिवोली मार्ना पंचायतीचे व्हीडीसी संयोजक जोअकिम बॅरोस म्हणाले की, अलीकडेच मी आरोग्य केंद्राला भेट दिली. तेव्हा मला स्वच्छतागृहासह टाइलिंगच्या समस्येबद्दल समजले. ज्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, आरोग्य केंद्रातील भिंतींवरही गळती व ओलसरणाच्या खुणा आहेत. दारे आणि खिडक्या देखील खराब झाले आहेत आणि ते बदलणे आवश्यक आहे.

‘साबांखा’ शी पत्रव्यवहार

आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आवश्यक काम करण्यासाठी आम्ही साबांखा इमारत विभागाकडे पत्रे लिहिली आहेत, असे त्यांनी सांगितले.

स्थानिकांकडून निराशा

अखेर या वर्षी जानेवारी २०२४मध्ये, प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले आणि सामान्य लोकांसाठी खुला करण्यात आला. परंतु, पावसाळ्यात ओलसरपणाची चिन्हे दिसून लागली. टाइलिंगच्या कामातील समस्या दिसत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी समस्यांबद्दल निराशा व्यक्त करत सांगितले की, नव्याने उद्घाटन झालेल्या ब्लॉकला गळती लागली आहे. एका स्थानिकाने सांगितले की, परिसरात दुर्गंधी सुद्धा पसरलेली आहे आणि कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, सेप्टिक टाकीमध्ये गळती आहे. ज्यामुळे दुर्गंधी येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मच्छिमारांच्या होड्या मच्छीमार खाते घेणार भाड्याने, किनारी गस्त मजबूत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न; इच्छुकांकडून मागवल्या निविदा

शापोरा नदीमुखाजवळ गाळाचा उपसा कासवांसाठी धोकादायक, काम स्थगित करण्याची वैज्ञानिकांकडून मागणी

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

सखा सोबती बनला वैरी? सुरक्षेची जबाबदारी झटकून ट्रम्प आता ग्रीनलँड 'गिळंकृत' करणार? - संपादकीय

Weekly Finance Horoscope: जानेवारीचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी ठरणार 'गेमचेंजर'! नोकरी-व्यवसायात मोठी झेप! 'या' राशींचे आर्थिक प्रश्न सुटणार

SCROLL FOR NEXT