Siolim water purification project Dainik Gomantak
गोवा

Siolim: शिवोलीवासीयांसाठी आनंदाची बातमी! पाणीप्रश्न कायमचा सुटणार; आसगाव, हणजूण, वागातोर, बादे, शापोरा परिसरालाही फायदा

Siolim Water Project: तीन जलवाहिन्यांपैकी दोन जलवाहिन्यांमधून प्रक्रिया केलेले पाणी या प्रकल्‍पात सोडण्यात येत आहे. त्यामुळे हणजूण-वागातोर व शिवोली-मार्ना या प्रमुख भागांना पाणीपुरवठा सुरू झाला.

Sameer Panditrao

म्हापसा: शिवोली मतदारसंघात पेयजल विभागाने ५.६ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प अंशतः कार्यान्वित केला आहे. त्‍यामुळे स्‍थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून त्‍यांची समस्‍या मार्गी लागली आहे.

तीन जलवाहिन्यांपैकी दोन जलवाहिन्यांमधून प्रक्रिया केलेले पाणी या प्रकल्‍पात सोडण्यात येत आहे. त्यामुळे हणजूण-वागातोर व शिवोली-मार्ना या प्रमुख भागांना पाणीपुरवठा सुरू झाला आहे. आसगावसाठी असलेल्या तिसऱ्या जलवाहिनीचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

शिवोली मतदारसंघातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी समर्पित जलशुद्धीकरण प्रकल्पाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

त्यानुसार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते व आमदार दिलायला लोबो यांच्या उपस्थितीत गेल्‍या वर्षी आसगाव येथे ८.१२ कोटी खर्चाच्या या ५.६ एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. पूर्ण कार्यान्वित झाल्यानंतर या प्रकल्पामुळे हणजूण, शापोरा, आसगाव, बादे आणि शिवोलीमधील ग्रामस्थांची पाण्याची समस्या सुटेल, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, जून-जुलै महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुद्धीकरण केंद्राची प्राथमिक चाचणी केली होती. नमुना प्रयोगशाळेकडून मान्यता मिळाल्यानंतर पेयजल विभागाने हा प्रकल्प अंशतः कार्यान्वित केला आहे. परिणामी, बंदिरवाडो-शापोरा, हणजूण, वागातोर, स्मॉल वागातोर, दाभोळवाडो, बादे, वाडी व मार्ना परिसरात पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

वर्ष अखेरपर्यंत प्रकल्‍प पूर्णत: मार्गी

प्रयोगशाळेकडून चाचणीला हिरवा कंदील मिळाल्यानंतर आम्ही ५.६ एमएलडी क्षमतेचा प्रकल्प अंशतः सुरू केला आहे. संपूर्ण प्रकल्प डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाशी तीन जलवाहिन्या जोडलेल्या आहेत. त्यापैकी दोन हणजूण लाईन व मार्ना लाईन कार्यरत आहे. तिसरी आसगाव लाईन डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर संपूर्ण परिसरातील पाण्याची समस्या सुटेल, असे अभियंता जॉन पायस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: लंडनला गेला, तरी पकडलंच! सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला करणारा संशयित वर्षभरानंतर गोवा पोलिसांच्या जाळ्यात; कोलकात्यात अटक

Codar: "देवा राखणदारा, IIT Project फाटी घें" कोडार ग्रामस्थांनी देवाला घातले ‘गाऱ्हाणे’; सरपंचाच्या घरासमोर मोर्चा काढण्याचा इशारा

Viral Video: 'तडपाओगे तडपा लो...!’ चिमुकलीनं गायलं लतादीदीचं गाणं, क्यूटनेसनं जिंकली नेटकऱ्यांची मनं; सोशल मीडियवर धूमाकूळ

Makharotsav in Goa: 16व्या शतकातील परंपरा, पोर्तुगीज आक्रमणातून वाचलेल्या मूर्तींचा अनोखा उत्सव; देवीच नाही तर भैरवाचाही भरतो 'मखरोत्सव'

Sattari Crime: बिहारच्या व्यक्तीवर गोव्यात अज्ञाताकडून गोळीबार, सत्तरीतील धक्कादायक घटना; परिसरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT