Single-use Plastic Ban Dainik Gomantak
गोवा

Goa News: ‘सिंगल यूज’प्लास्टिक बंदीचे तीनतेरा

कायद्याने बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा बाजारात आता सरार्सपणे वापर होत आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: ‘सिंगल यूज’ (एकदाच वापरता येणारी) प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असतानाही, डिचोली बाजारात या पिशव्यांचा बिनदिक्कतपणे वापर होत असल्याचे आढळून येत आहे. कायद्याने बंदी असलेल्या या पिशव्यांचा बाजारात आता सरार्सपणे वापर होत आहे.

एकंदरीत बाजारातील दृश्‍य पाहता ‘सिंगल यूज’ प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीचा निर्णय फसल्यातच जमा आहे. या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने विक्रेते आणि ग्राहकांचे आयतेच फावत आहे. सहा महिन्यांपूर्वी ‘सिंगल यूज’ प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

राज्यात ही बंदी लागू झाल्यानंतर सुरवातीचा महिना-दीड महिनाभर ‘सिंगल यूज’ प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण आले होते. अधूनमधून पालिका आणि प्रशासकीय यंत्रणेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत होती.

हळूहळू कारवाई मंदावली आणि पुन्हा सिंगल यूज प्लास्टिक बाजारात दिसू लागले. आता तर फळ-भाजी, मासळी आदी विक्रेत्यांकडे या पिशव्या पुन्हा उपलब्ध होत आहेत.

ग्राहकही जबाबदार

बाजारात फळ-भाजी किंवा मासळी खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक स्वतः पिशव्या घेऊन येत नाहीत. तेव्हा त्यांना पिशव्या द्याव्या लागतात. महागड्या पिशव्या देणे परवडत नाही. त्यामुळे सिंगल यूज पिशव्या वापरणे भाग पडते. असे बाजारातील एका महिला भाजी विक्रेतीचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT