Goa News |Principals National Conference  Dainik Gomantak
गोवा

Goa News: प्राचार्यांच्या संघटनेचे रौप्यमहोत्सवी राष्ट्रीय संमेलन शुक्रवारपासून गोव्यात

देशभरातील 350 प्राचार्य सहभागी होणार : 50 संशोधनपर प्रबंध सादर होणार

दैनिक गोमन्तक

Goa News: गोव्यातील बिगरसरकारी महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांचे प्रतिनिधी व प्राचार्यांच्या मंच यांच्यातर्फे भारतीय महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या संघटनेचे रौप्य महोत्सवी राष्ट्रीय संमेलन गोव्यात मनोरा, राय, साष्टी येथील व्ही.एम. साळगावकर इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी एज्युकेशन महाविद्यालयात 10 व 11 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.

फोरमने हे संमेलन गोवा सरकारचे उच्च शिक्षण संचालनालय तसेच व्ही.एम. साळगावकर इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी एज्युकेशन, मनोरा, राय, सासष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे.

या संमेलनात देशातील विविध भागातील सुमारे 350 प्राचार्य भाग घेणार असून एकूण 50 संशोधनपर प्रबंध सादर केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे या संमेलनाचे उद्‍घाटन करणार आहेत.या संमेलनाचा विषय ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण (एन.ई.पी.) 2020: संधी, आव्हाने व पुढील मार्गक्रमणर् असा आहे, अशी माहिती फोरमचे अध्यक्ष दिलीप आरोलकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी फोरमच्या सचिव राधिका नायक, संयुक्त सचिव विवेक पिसुर्लेकर, फोरमचे समन्वयक भूषण भावे आणि आयोजन सस्थेचे प्राचार्य इर्शाद मिर्झा हे उपस्थित होते.

उद्‍घाटन समारंभावेळी ए.आय.सी. पी. च्या संस्थापक सदस्यांचा तसेच तसेच कुलगुरू बनलेल्या तीन सदस्यांचा सन्मान करण्यात येईल. या कार्यक्रमात तीन पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात येईल.

उद्‍घाटनाला मान्यवर 

या संमेलनाचे उद्‍घाटन 10 फेब्रुवारी रोजी स. 10 वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर हरिलाल मेनन, गोवा सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर (आय.ए.एस.), दत्तराज साळगावकर, अध्यक्ष, व्ही.एम. साळगावकर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, प्रोफेसर एम. के. श्रीधर, संस्थापक कुलपती, चाणक्य विद्यापीठ, डॉ. सुधीर नानावटी, अध्यक्ष जी.एल. एस. विद्यापीठ, गुजरात व इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित राहतील.

50 संशोधन प्रपत्रे सादर होणार

देशभरातील विविध महाविद्यालयांतून तीनशेपेक्षा अधिक प्राचार्य या संमेलनाला उपस्थित राहतील. या संमेलनात सुमारे 50 संशोधन प्रपत्रे सादर होतील. संमेलनातील चर्चासत्रांमुळे एन.ई.पी. 2020 च्या अंमलबजावणीतील विविध संधी व आव्हाने यांचे आकलन होण्यास मदत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तिसऱ्या अपत्याला 30 हजार तर चौथ्याला 40 हजार, आंध्र प्रदेश सरकारची अनोखी स्कीम; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा VIDEO

Rahu Gochar: नक्षत्र बदलून राहू करणार 3 राशींना मालामाल; मनासारखी नवीन नोकरी आणि मोठ्या पॅकेजची मिळणार ऑफर

Team India: क्रीडा जगतात मोठी खळबळ! टीम इंडियाच्या प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप, थेट हकालपट्टीची कारवाई

Goa Dairy Subsidy: दूध उत्पादक आक्रमक! मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू; उत्तर गोवा शेतकरी संघटनेचा सरकारला थेट इशारा

Middle East War: एलपीजी, पेट्रोल अन् डिझेल आणखी महाग होणार? ट्रम्प-नेतान्याहूकडून मोठ्या हल्ल्याची तयारी; 'टार्गेट लिस्ट' बनवली

SCROLL FOR NEXT