Mayem Dainik Gomantak
गोवा

Mayem News : ‘सिकेरी गोशाळे’मुळे भागात प्रदूषण वाढतेय; मये ग्रामसभेत दावा फेटाळला

Mayem News : गोशाळेचे सर्वेसर्वा कमलाकांत तारी यांनी हा दावा खोडून काढला. तर, मात्र या सनदी ‘ब’वर्गाच्या असल्याने सनदीना अर्थ नाही. सनदी देऊन सरकारने मयेवासीयांची बोळवण केली आहे, असा दावा माजी सरपंच सुभाष किनळकर यांनी केला.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली, मये-वायांगिणी पंचायतीच्या आजच्या ग्रामसभेत गोमंतक गौसेवक महासंघ संचलित सिकेरी येथील गोशाळेचा मुद्दा तापला. या गोशाळेपासून प्रदूषण होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला.

तर गोशाळेचे सर्वेसर्वा कमलाकांत तारी यांनी हा दावा खोडून काढला. तर, मात्र या सनदी ‘ब’वर्गाच्या असल्याने सनदीना अर्थ नाही. सनदी देऊन सरकारने मयेवासीयांची बोळवण केली आहे, असा दावा माजी सरपंच सुभाष किनळकर यांनी केला.

मयेतील स्थलांतरीत मालमत्तेसंदर्भात सरकारने कायदा करुन मयेतील जनतेला सनदी दिल्या आहेत. ज्या लोकांना सनदी दिल्या आहेत. त्यांची नावे एक चौदाच्या उताऱ्यात समाविष्ट करावीत, अशी मागणीही त्यांनी केली.

लोकांना प्रदूषण वा अन्य कोणताच त्रास होणार नाही. त्याची पूर्णपणे काळजी घेण्यात येत असल्याचे तारी यांनी स्पष्ट केले. प्रदूषण होत असल्याचे दाखवून दिल्यास गोशाळा बंद करण्यास आपण तयार आहे. असेही तारी यांनी सांगितले.

तर या गोशाळेच्या विषयी आरोग्य खात्याशी पत्रव्यवहार करुन त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेण्याचे स्पष्ट केले. या ग्रामसभेत प्रामुख्याने ‘सनद’ विषय चर्चेत आला. गावाबाहेरील व्यक्तींना मयेत बांधकामे करण्यास पंचायतीने परवानगी देऊ नये,अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. मये-वायंगिणी पंचायतीची ग्रामसभा आज (रविवारी) सरपंच आरोंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन पंचायत इमारतीतील सभागृहात पार पडली. पंचायत सचिव महादेव नाईक यांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले.

माजी सरपंच तुळशीदास चोडणकर, सखाराम पेडणेकर, विजय पोळे आणि विश्वास चोडणकर यांच्यासह ग्रामस्थांनी विविध विषयांवरील चर्चेत सहभाग घेतला. या ग्रामसभेस उपसरपंच सुफला चोपडेकर यांच्यासह विद्यानंद कारबोटकर, दिलीप शेट, कनिवी कवठणकर,वासुदेव गावकर, विशांत पेडणेकर, कृष्णा चोडणकर, सुवर्णा चोडणकर, वर्षा गडेकर विनिता पोळे हे सर्व पंचसदस्य उपस्थित होते. ग्रामसभेस ८० च्या आसपास ग्रामस्थ उपस्थित होते.

घाईत पंचायतीचे लोकार्पण!

काम अर्धवट असताना घाईगडबडीने पंचायतीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आल्याची टीका सुभाष किनळकर यांनी केली. पाटो येथील रस्त्याचे काम चतुर्थीपूर्वी पूर्ण करावे. अशी मागणीही ग्रामसभेत करण्यात आली. मये गावातील तिठ्यांवर ‘श्वेत कपिला’ गायीच्या प्रतिकृती उभारा, अशी मागणी कमलाकांत तारी यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेत महापौरपदी 'चीनी एजंट'! 'US News Center' च्या नावाखाली चालवला प्रोपगंडा; ईलीन वांगला होणार 10 वर्षांची शिक्षा?

Vish Yog 2026: ग्रहांच्या महायुतीनं बनला 'विष योग'! 3 राशींच्या डोक्यावर संकटाची टांगती तलवार; शनीची चाल बदलणार नशीब

Viral Video: 'दोरी ओलांडली अन् भारतात घुसले'; पाकिस्तानी इन्फ्लुएंसरचा अजब दावा, नेटकऱ्यांनी काढली चांगलीच खोड

Tar River Pollution: तार नदीचे अस्तित्व धोक्यात: वाढत्या प्रदूषणामुळे नदीची अवस्था बिकट VIDEO

Virat Kohli Lizlaz Controversy: "विराटची बदनामी करण्यासाठी मला पैशांचं आमिष दाखवलं" जर्मन मॉडेलचा खळबळजनक खुलासा

SCROLL FOR NEXT