Manish Jadhav
गोव्याचा तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्की येथील प्राचीन मंदिरे पाहा. तुम्हाला येथे अनेक शिवकालीन मंदिरे पाहायला मिळतील.
गोव्याला समृद्ध अशा नैसर्गिक वारशासोबत मंदिराचाही वसा मिळाला आहे. आज आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून चंद्रेश्वरी भूतनाथ मंदिराबाबत जाणून घेणार आहोत...
मडगावपासून 14 कि.मी. अंतरावर असणाऱ्या पारोडा या गावातील एका उंच पर्वतावर हे मंदिर आहे.
8 व्या शतकात भूतनाथ मंदिर बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. तत्कालीन चंद्रपूर गावाच्या नावावरुन या देवस्थानाला चंद्रेश्वर नाव पडल्याची मान्यता आहे.
भोज वंशातील राजांनी भूतनाथ मंदिराची निर्मिती केल्याचे समजते.
महाशिवरात्रीला या मंदिरात चंद्रेश्वराच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात.