गोवा

श्यामाप्रसाद मुखर्जींचा भारतीय समाजकारणावर प्रभाव: तुयेकर 

डॉ. मुखर्जी एक उत्तुंग व्यक्तिमत्व

दैनिक गोमन्तक

मडगाव: देशाची एकात्मता व अखंडता हाच ध्यास असलेले डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांचे जीवन कार्य व विचारसरणीचा भारतीय राजकारण आणि समाजकारणात आजही प्रभाव जाणवतो, असे उद्गार नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी काढले.  रुमडामळ - दवर्ली येथे भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. भाजपच्या नावेली मंडळाचे अध्यक्ष परेश नाईक, सरचिटणीस दीपक सावंत, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.  ( Shyamaprasad Mukherjee's Influence on Indian Sociology: MLA Ulhas Tuenkar )

डॉ. मुखर्जी एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते उद्योगमंत्री होते. उद्योगमंत्री म्हणून अल्पकाळातच त्यांनी आपली छाप पाडली होती. पण, देशाची एकात्मता आणि अखंडता सर्वोच्च मानणाऱ्या राष्ट्रवादी विचारसरणीच्या डॉ. मुखर्जी यांना नेहरुंची काही धोरणे न पटल्याने त्यांनी मंत्रीपदाचा त्याग केला. काश्मिरला लागू केलेले 370 कलम रद्द करण्यासाठी त्यांनी चळवळ उभी केली होती.

एक विधान, `एक देश में दो विधान, दो प्रधान व दो निशान नही चलेंगे` असा नारा देत काश्मिरमध्ये जाऊन त्यांनी आंदोलन केले. या प्रसंगी त्यांना अटक होऊन नंतर त्यांचे संशयास्पद स्थिती निधन झाले. देशाची एकात्मता व अखंडता यासाठी त्यांनी हे बलिदान दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 370 कलम रद्द करून देशाच्या अखंडतेच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला.

याचे बरेचसे श्रेय डॉ. मुखर्जी यांनी उभारलेल्या चळवळीला जाते असे तुयेकर यांनी सांगितले. आज भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे. भाजपचे मूळ रूप असलेल्या जनसंघाची स्थापना डॉ. मुखर्जी यांनी केली होती. राष्ट्रवादी विचारसरणीच्या पक्षाची भाजपला गरज असल्याची दिव्यदृष्टी त्यांच्याकडे होती, असे तुयेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT