Yuri Alemao
Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: प्रदूषणकारी उद्योग त्वरित बंद करा

गोमन्तक डिजिटल टीम

गेल्या १० वर्षातील बेकायदेशीरपणा आणि प्रदूषणामुळे कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत ही कुंकळ्ळीच्या रहिवाशांसाठी शाप ठरली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमताने आणि माजी आमदारांच्या आशीर्वादाने सर्व बेकायदेशीर प्रकार सुरू आहेत. अशा सर्व बेकायदेशीर व प्रदूषणकारी आस्थापने व कारखाने त्वरित कायमस्वरूपी बंद करावे, असे मत युरी आलेमाव म्हणाले.

आगामी विधानसभा अधिवेशनातील माझ्या तारांकित प्रश्नांमुळे सरकारला कामगार आयुक्त, औद्योगिक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि कारखाने आणि बॉयलरचे निरीक्षक यांना विविध कारखाने व आस्थापनांची संयुक्त तपासणी करण्यासाठी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत पाठवण्यास भाग पाडले.

सदर औद्योगिक वसाहतीतील बेकायदेशीरपणा व गैरकारभाराविरुद्ध कठोर कारवाई होणे महत्त्वाचे आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

शुक्रवार 17 मार्च रोजी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत तीन सरकारी विभागांच्या संयुक्त तपासणीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, युरी आलेमाव यांनी गोव्यातील औद्योगिक वसाहतीमधील एकंदर कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी नोडल एजन्सी नेमण्याच्या आपल्या मागणीचा पुर्नउच्चार केला.

उच्चस्तरीय आयोग नेमा

गोव्यातील औद्योगिक वसाहतींच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी आणि प्रदूषण, स्फोट व अपघात आणि सरकारी महसूल बुडविणे याचे मुख्य कारण असलेला बेकायदेशीरपणा तपासण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या आधिपत्याखाली तज्ज्ञांचा उच्चस्तरीय चौकशी आयोग नेमावा अशी विनंती करणारा खाजगी सदस्य ठरावही मी सरकारला सादर केला आहे अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa River: राज्यातील सहा नदीपट्टे प्रदूषित; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जलस्रोतांची पाहणी

Santa Cruz Panchayat: सांताक्रुझ पंचायत सत्ता सारीपाटावर; ‘विरोधी’ सोंगट्यांना कोटींचे लालूच?

Calangute ODP: कळंगुट ओडीपी खटला लांबणीवर; सुनावणीसाठी तयार नसल्याने सरकारवर ओढावली नामुष्की

Goa Rain Update: गोव्यात 'यलो अलर्ट': पणजीत सर्वाधिक तापमानाची नोंद

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा प्रवासासाठी आता तीन पर्याय; महाराष्ट्र सरकारकडून आणखी दोन महामार्गांचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT