Shripad Naik  Dainik Gomantak
गोवा

Sripad Naik: श्रीपाद नाईकांचा देशभर ठसा, राज्यपालांकडून गौरव

गोमन्तक डिजिटल टीम

Sripad Naik: पणजी,केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केंद्रात जी पदे भूषविली, त्या पदांचा त्यांनी जनतेच्या कल्याणार्थ उपयोग केला. त्यांची कर्मभूमी केवळ गोवा नसून संपूर्ण देश आहे. आपल्या कार्याचा त्यांनी संपूर्ण देशात ठसा उमटविलेला आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी काढले.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त गेली २५ वर्षे गोव्याच्या विसाकासाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या समाजसेवकांच्या गौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर श्रीपाद नाईक यांच्या व्यतिरिक्त पर्येच्या आमदार दिव्या राणे, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, गोवा शिक्षण विकास महामंडळाचे अध्यक्ष गोविंद पर्वतकर, संकृत पंडित डॉ. गोविंद काळे, भाजपाचे उत्तर गोवा अध्यक्ष महानंद अस्नोडकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

बोलण्यात दिसते त्याचे प्रत्यक्ष वर्तन जीवनात दिसले पाहिजे. “पतत्वेस कायो नमस्ते नमस्ते” संघाच्या प्रार्थनेतील हे विचार भाऊंच्या जगण्याचा आदर्श आहेत. उक्ती आणि कृती याचे अद्वैत म्हणजे भाऊ असे डॉ. गोविंद काळे यांनी यावेळी सांगितले.

महानंद अस्नोडकर यांनी स्वागत केले. गोविंद पर्वतकर यांनी प्रास्ताविक केले. गोविंद भगत यांनी सूत्रसंचालन केले.

या गौरव सोहळ्यात उत्तर गोवा भाजपा मंडळ अध्यक्ष आणि मंड़ळ समित्यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रत्येक मंडळाला साऊंड सिस्टिम प्रदान करण्यात आले.विविध शिबिरे ः या वर्षी प्रथमच युनानी आणि सिद्धा या उपचार पद्धतीची शिबिरे भरविण्यात आली.

याव्यतिरिक्त आयुर्वेदिक, होमिओपॅथिक शिबिरांचेही आयोजन करण्यात आले. सांडू फार्मास्युटिकल्सनेही या शिबिरात सहभागी होऊन गरजूंना औषधे मोफत वितरित केली गेली.

`चांदणे स्वरांचे` रंगले ः रात्री `निषाद`तर्फे सादर करण्यात आलेल्या `चांदणे स्वरांचे` या भावगीते, भक्तिगीते आणि चित्रपट गीतांवर आधारित बहारदार कार्यक्रमाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.

कलर्स टीव्हीच्या `सूर नवा, ध्यास नवा` या मालेकेत अव्वल पांचमध्ये आलेला नवाब शेख याला श्रोत्यांकडून प्रचंड दाद मिळाली. अक्षता रामनाथकर व मुक्ता मिसर यांनीही आपल्या सुमधुर गाण्यांनी रसिकांची मने जिंकली.

नेत्रचिकित्सा शिबिराला प्रतिसाद

नाईक यांच्या वाढदिनानिमित्त मातृभूमी सेवा प्रतिष्ठान, गोवातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रचिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिराला नेहमी प्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रसाद नेत्रालय, उडुपीतर्फे घेण्यात आलेल्या या शिबिराचा ७५० पेक्षा अधिक नेत्ररुग्णांनी लाभ घेतला.

नेत्रतपासणीत ३८० रुग्णांना चष्म्यांची आवश्यकता असल्याचे आढळून आले. त्यांना लवकरच मोफत चष्मे प्रदान करण्यात येणार आहेत. दरम्यान, २५ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी उडुपीला नेण्यात आले असून त्यांच्यावर मोफत शस्रक्रिया केली जाईल.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली २००४ पासून कार्यरत असलेल्या मातृभूमी सेवा प्रतिष्ठानचा हा उपक्रम नेत्ररुग्णांसाठी एक वरदान ठरले आहे.

औषधी वनस्पतींचे वाटप

यंदाही विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचे मोफत वितरण करण्यात आले. लोकांमध्ये औषधी वनस्पतींबद्दल वाढते आकर्षण दिसून आले.

या वनस्पतींमध्ये पेरू, चाफा, डाळिंब, शतावरी, वट्टेलाव, पानफुटी, पिंपळी, मानपत्ती, भिरंड, आवळा, जांभूळ, बेल,चंदन, नोनी, तिखी, ब्राम्ही, पुनर्नवा, इंन्सुलिन, रामफळ, लक्ष्मीतरू, तुलशी, कढीपत्ता आदि वनस्पतींचे यंदा वितरण करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT