Central Minister Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Central Minister Shripad Naik: श्रीपाद नाईकांचा वाढदिवस उत्साहात

Central Minister Shripad Naik: राज्यपाल : भाऊ एक शांत व्यक्तिमत्त्व

दैनिक गोमन्तक

Central Minister Shripad Naik: भाऊंनी गेल्या 25 वर्षांत मंत्री आणि खासदार म्हूणून केवळ गोव्यात नाही, तर संबंध देशात चांगले काम केले आहे. एक उत्तम व्यक्ती आणि शांत स्वभाव असलेल्या नाईक यांनी आपल्या पदाचा, तसेच जनतेचादेखील मान राखला आहे.

त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्राथना करतो, असे उद्‌गार राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी काढले.

केंद्रीय मंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (ता.४) राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी नाईक यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यपालांसोबत त्यांची पत्नी रिता पिल्लई याही उपस्थित होत्या.

भाऊंच्या वाढदिवसानिमित्त सकाळी मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर ठेवण्यात आले होते. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. सायंकाळी ज्येष्ठ भाजप कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा ठेवण्यात आला होता.

या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून राज्यपाल पिल्लई उपस्थित होते. राज्यपालांनी सायंकाळी पोहोचल्यानंतर भाऊंना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

श्रीपाद नाईक यांचे गोव्यासाठी मोठे योगदान आहे. त्यांच्या कारकि‍र्दीत अनेक विकासकामे झाली. अनेक वर्षांपूर्वी त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर त्यांना जाणून घेण्याची संधी मिळाली होती. आता गोव्यात आल्यानंतर आमची मैत्री आणखी घट्ट झाली आहे. - पी.एस. श्रीधरन पिल्लई, राज्यपाल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

Goa Rain Water Harvesting: 47 सरकारी शाळांतच 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'! राज्यातील 7 टक्के शाळांकडून सरकारी धोरणाला प्रतिसाद

Goa politics: 'NDZ'ला विरोध कशासाठी? दिल्लीतील लॉबीने गोव्‍यात खरेदी केलेल्‍या जमिनी वाचवण्‍यासाठी धडपड? मिकी पाशेको यांचा आमदार व्हेंझींना सवाल

Goa Health Insurance: "प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला 10 लाखांचा हेल्थ इन्शुरन्स द्या", 'आप'ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, चर्चेसाठी मागितला वेळ

SCROLL FOR NEXT