Shreya Dhragalkar Arrested Dainik Gomantak
गोवा

Shreya Dhragalkar Arrested: श्रेयाला कुंकळ्‍ळीत जामीन, डिचोली पोलिसांकडून अटक

Shreya Dhragalkar Arrested: समाजमाध्‍यमांवर देवस्‍थानाबद्दल आक्षेपार्ह व्‍हिडिओ टाकल्‍यामुळे संतापलेल्‍या भाविकांनी कुंकळ्‍ळी पोलिस स्‍थानकावर तक्रार नोंदविली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Shreya Dhragalkar Arrested

फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्‍ळीकरीण देवस्‍थानाबद्दल वादग्रस्‍त वक्तव्‍य केल्‍याप्रकरणी कुंकळ्‍ळी पोलिसांनी अटक केलेल्‍या श्रेया धारगळकर हिला आज केपे न्‍यायलयाने जामीन मंजूर केल्‍यानंतर ताबडतोब डिचोली पोलिसांनी अटक केली.

शिरगावचे श्री लईराई देवस्‍थान व धोंड भक्तांबद्दल तिने अपमानास्पद विधान केले होते. दरम्‍यान, श्रेयाला अटक करताच लईराईच्‍या भक्तांनी सायंकाळी

डिचोली पोलिस स्थानकावर धडक देऊन तिला आमच्यासमोर हजर करा अशी मागणी करत आतमध्‍ये घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्‍ता रोखून धरला. दरम्‍यान, रात्री ९ वाजता श्रेयाला न्यायालयासमोर हजर केले असता ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्‍यात आला.

रात्री ८ वाजेपर्यंत पाचशेहून अधिक भक्त पोलिस स्थानकावर जमा झाले होते. ते बरेच संतप्‍त आणि आक्रमक झाले होते. ‘श्रेयाला संरक्षण देणाऱ्यांचा सत्यानाश होऊ दे’ असे गाऱ्हाणे घालत त्‍यांनी पोलिस स्थानकाबाहेर नारळ फोडला. नंतर पोलिस स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडून रस्ता अडवला. रात्री उशिरापर्यंत ते डिचोली-साखळी रस्त्यावर ठाण मांडूनच होते.

गेल्या सोमवारी लईराईच्‍या भक्तांनी डिचोली पोलिस स्थानकावर धडक दिली होती. श्रेया हिला अटक करा अशी मागणी त्‍यांनी लावून धरली होती. आमदार डॉ. चंद्रकांत शेट व प्रेमेंद्र शेट यांनीही पोलिस स्थानकावर उपस्थित राहून लईराई भक्तांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर डिचोली पोलिसांनी श्रेयाविरोधात गुन्हा नोंद केला होता.

दरम्‍यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताच रात्री उशिरा उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी डिचोलीत दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यांची बैठक सुरू होती.

फातर्पा गावात पाय न ठेवण्‍याच्‍या अटीवर जामीन मंजूर

फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्‍ळीकरीण देवस्‍थान आणि तमाम भाविकांच्‍या भावना दुखावल्‍याप्रकरणी अटक करण्‍यात आलेल्‍या श्रेया धारगळकर आणि नमिता फातर्पेकर या दोघींना आज केपे न्‍यायालयाने जामीनमुक्‍त केले खरे, मात्र न्‍यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत या दोघींनीही फातर्पा गावात पाऊल न ठेवण्‍याची कडक अट त्‍यांना घालण्‍यात आली आहे.

समाजमाध्‍यमांवर देवस्‍थानाबद्दल आक्षेपार्ह व्‍हिडिओ टाकल्‍यामुळे संतापलेल्‍या भाविकांनी कुंकळ्‍ळी पोलिस स्‍थानकावर तक्रार नोंदविली होती. त्‍यानंतर पोलिसांनी श्रेया धारगळकर आणि नमिता फातर्पेकर या दोघींनाही अटक केली होती. आपल्‍याला जामीन मिळावा यासाठी त्‍या दोघींनी केपे न्‍यायालयात अर्ज केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

SCROLL FOR NEXT