Hindu Janjagruti Samiti on Goa Tourism:  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्याच्या पर्यटनात मंदिरे दाखवा, कमी कपड्यातील महिला असलेले बीच नको; हिंदू जनजागृती समितीची मागणी

गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषदेत मंथन

Akshay Nirmale

Hindu Janjagruti Samiti on Goa Tourism: गोव्याची प्रतिमा कॅसिनो आणि कमी कपड्यातील महिला असलेले बीच अशी बनली आहे, अशी टीका करत गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला आणि मंदिर पर्यटनाला चालना द्या, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने रविवारी केली.

गोमंतक मंदिर फेडरेशन आणि दक्षिण गोव्यातील हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषद' या परिषदेत मंदिर संस्कृती जतन करण्यावर चर्चा झाली.

यावेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे म्हणाले की, "गोव्याची प्रतिमा कॅसिनो, कमी कपड्यातील महिला असलेले समुद्रकिनारे, 'सनबर्न' अशी झाली आहे. हीच गोव्याची संस्कृती आहे का? गोव्यात मंदिर संस्कृती का वाढवली जात नाही?" असा सवालही त्यांनी केला.

ते म्हणाले की, अलीकडे गोवा सरकारने मंदिर संस्कृतीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे, ही चांगली बाब आहे. उत्तर प्रदेशात 'काशी विश्वनाथ कॉरिडॉर बांधल्यानंतर, एका वर्षात 8 कोटी पर्यटकांनी तेथे भेट दिली.

तर गोव्यात, कॅसिनो, समुद्रकिनारे, 'सनबर्न' सारख्या उत्सवांना प्रोत्साहन दिले जात असूनही गेल्या वर्षी केवळ 73 लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. गोव्यात मंदिर पर्यटनाला चालना मिळू नये का? मंदिरांचे पावित्र्य जपणाऱ्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे.

"गोव्यात काही ठिकाणी विश्वस्त, महाजन, पुजारी आदींमध्ये वाद सुरू आहेत. त्यामुळे खटले सुरू आहेत.

आज 5 कोटी खटले कोर्टात प्रलंबित आहेत आणि न्याय मिळण्यासाठी पिढ्यानपिढ्या वाट पाहावी लागत आहे. मंदिरांचे अंतर्गत वाद आपापसात मिटवले पाहिजेत, असेही शिंदे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT