Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

‘त्या’ उपवनसंरक्षकांना कारणे दाखवा नोटीस: विश्वजीत राणे

वाघेरी प्रकरण: वन अधिकारी निलंबित

दैनिक गोमन्तक

पणजी: वाघेरी येथील बेकायदा डोंगर कापणी, रस्ते बांधणी, जमीन खरेदी-विक्री प्रकरणी क्षेत्रिय वन अधिकारी विवेक गावकर यांना निलंबित केले असून उपवनसंरक्षक संतोष फडते यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी आज दिली.

वाळपईजवळ वाघेरी डोंगरावर खासगी जंगल आहे. मात्र, त्याची खरेदी-विक्री किंवा ते विकसित करण्यावर अनेक निर्बंध आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन करून येथे अनेक जमीन व्यवहार झाले आहेत. त्यावर वन मंत्री विश्‍वजीत राणे यांंनी आज ही कारवाई केली.

सोमवारी त्यांनी या प्रकरणातील सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज त्यांनी निलंबनाचा आदेश जारी केला.

राज्यात वाघेरी डोंगरासारखे अनेक निसर्गसंपन्न परिसर आहेत, जे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर होणे गरजेचे आहे. यासाठी येत्या सहा महिन्यांत केंद्र सरकारच्या मदतीने वाघेरी डोंगर वन्यजीव संवेदनशील परिसर म्हणून जाहीर करणार असल्याची माहितीही वनमंत्री राणे यांनी दिली होती.

वाघेरी डोंगरावर सध्या मोठ्या प्रमाणात डोंगर कापणीचे प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी मुख्य प्रधान वनसंरक्षकांना क्षेत्रिय वन अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश दिले होते. तसेच उपवनसंरक्षकांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यास सांगितली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

- विश्‍वजीत राणे, वनमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT