Konkan Railway Upadtes Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: कोकण रेल्‍वेला कारणे दाखवा नोटीस! बेकायदेशीर डाेंगरकापणीची तक्रार; कुंकळ्ळी येथील प्रकार

Konkan Railway Show Cause Notice: कुंकळ्‍ळी येथे कोकण रेल्‍वेतर्फे डोंगर कापून माती काढण्‍याचे काम सुरू होते ते स्‍थानिकांनी विरोध केल्‍यानंतर दक्षिण गोवा जिल्‍हाधिकारी कार्यालयातर्फे काल बंद पाडण्‍यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: कुंकळ्‍ळी येथे कोकण रेल्‍वेतर्फे डोंगर कापून माती काढण्‍याचे काम सुरू होते ते स्‍थानिकांनी विरोध केल्‍यानंतर दक्षिण गोवा जिल्‍हाधिकारी कार्यालयातर्फे काल बंद पाडण्‍यात आले. यासंदर्भात आता कोकण रेल्‍वेला सासष्‍टीचे उपजिल्‍हाधिकारी वेल्‍टन टॅलीस यांनी कारणे दाखवा नोटीस जारी केली असून ४८ तासांत या प्रकाराबद्दल कोकण रेल्‍वेने स्‍पष्‍टीकरण द्यावे, असे या नोटिसीत म्‍हटले आहे.

कोकण रेल्‍वेतर्फे दवर्ली भागात हे काम हाती घेतले असून यासाठी मातीचा भराव घातला जात आहे. ही माती कुंकळ्‍ळीतून आणली जात होती. मात्र, स्‍थानिकांनी त्‍याला आक्षेप घेतला होता. स्‍थानिकांनी आवाज उठविल्‍यानंतर जिल्‍हा प्रशासनाने हे काम बंद पाडले.

या डोंगरकापणीसाठी कोकण रेल्‍वेकडे कोणते परवाने आहेत हे त्‍यांनी सादर करावेत, असे या नाेटिसीत म्‍हटले आहे. नगर नियोजन खात्‍याने याबाबत चाैकशी सुरू करावी, असेही निर्देश त्‍यांना देण्‍यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्रसरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

SCROLL FOR NEXT