Tourist Places In India Dainik Gomantak
गोवा

Goa Tourist Attack : पर्यटक हल्ला प्रकरणी दोन हॉटेल्सना कारणे दाखवा नोटीस जारी

सर्व हॉटेलमालकांनी कामगारांना नोकरी देण्याआधी त्यांची चौकशी करावी

दैनिक गोमन्तक डिजिटल

उत्तर गोव्यात कळंगुट आणि पेडणे पोलिस स्थानकाच्या क्षेत्रात काही दिवसांपूर्वी पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यांप्रकरणी पर्यटन खात्याने दोन हॉटेलांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या नोटिसीमध्ये हॉटेल आणि रिसॉर्टमालकांना पर्यटकांना इजा केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई का करू नये, अशी विचारणा करण्यात आली आहे.

यापूर्वी राज्यातील सर्व हॉटेलमालकांनी कामगारांना नोकरी देण्याआधी त्यांची चौकशी करावी, पोलिस पडताळणी आणि गोव्याच्या बाहेरून आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी कामगार विभागाकडून मजूर ओळखपत्र द्यावे, या बाबींसाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

सर्व हॉटेल्स व गेस्ट हाऊसना पर्यटन खात्याकडे नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कामावर ठेवण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची पोलिस खात्यामार्फत पडताळणी करण्याचीही आवश्‍यकता आहे.

या नियमांचे पालन न करणारे हॉटेल व रिसॉर्ट उघडकीस आल्यास त्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असा इशारा पर्यटन खात्याने दिला आहे. तथापि, राज्यात पर्यटकांना गैर वागणूक दिल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT