Goa dairy  Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy: कथित गोवा डेअरी घोटाळा प्रकरण; सहकार निबंधकाकडून 18 संचालकांना नोटीस

गोवा डेअरीला तत्कालीन संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या सदोष निर्णयामुळे सहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Dairy: गोवा डेअरीला तत्कालीन संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या सदोष निर्णयामुळे सहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी सहकार निबंधकाकडून संचालक मंडळावर असलेल्या 18 व्यक्तींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहकारी संस्थांच्या निबंधकांनी 17 फेब्रुवारी रोजी कथित गोवा डेअरी घोटाळा प्रकरणी सहकारी संस्था निबंधक, पाटो-पणजी येथील कार्यालयात सुनावणी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा डेअरी कथित घोटाळ्याची चौकशी करण्यास सहकारी संस्थांचे निबंधक दिरंगाई करत आहेत. असा आरोप तक्रारदारांनी करत उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने सहकारी संस्थांच्या निबंधकांना तीन महिन्यांत चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.

पशुखाद्य निर्मिती केंद्रात दर्जाहीन साहित्य वापरण्यात आल्याचे, म्हशीचे दूध शेजारील राज्यातून अधिक दराने खरेदी करण्यात आले, आईस्क्रीम प्लांटसाठी कमी दर्जाचे मशिन खरेदी करण्यात आले. असे सहाय्यक निबंधकांनी केलेल्या चौकशी अहवालातून समोर आले आहे. याचा फटका गोवा डेअरीला बसला असून यात एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; ...मडगावकर मतदान करणार नाहीत!

Goa Live Updates: प्रदूषण रोखण्यासाठी होणार तपासणी मोहीम

Bits Pilani: ऋषी नायरला ड्रग्स कुठून मिळाले? त्याच्या खोलीत कोण आले होते? 'बिट्स पिलानी'तील मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीची मागणी

Electricity Bill Scam: ग्राहकांकडून घेतले वीज-बिलाचे पैसे, बँकेत भरलेच नाहीत; 8 लाखांचा घोटाळा, 2 कर्मचारी निलंबित

Online Scam: सोशल मीडियावरून ओळख वाढवली, गुंतवणुकीच्या नावे घातला 20 लाखांचा गंडा; केरळच्या तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT