Xeldem Hill-Cutting News Update Dainik Gomantak
गोवा

Xeldem Hill Cutting: शेल्डेतील बेकायदेशीर डोंगर कापणी स्थगित!! ४८ तासांच्या अवधीसह करणे दाखवा नोटीस जारी

Xeldem News Update: भरारी पथकाला पाहणीतून या भागात बेकायदेशीरपणे डोंगरकापणी सुरु असल्याची माहिती मिळाली आणि म्हणूनच डोंगरकापणीच्या विरोधात करणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे

Akshata Chhatre

Show Cause Notice For Illegal Hill Cutting at Xeldem Goa

केपे: राज्य सरकारने डोंगर कापणीविरोधात कडक भूमिका घेतली असून देखील राज्यात बऱ्याच ठिकाणी डोंगर कापणी करून प्लॉट तयार केले जात आहेत. अशीच डोंगरकापणी शेल्डे पंचायत क्षेत्रात झाली असून या डोंगरकापणी विरोधात आता करणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे.

उपजिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आदेशानुसार भरारी पथकाला पाहणीतून या भागात बेकायदेशीरपणे डोंगरकापणी सुरु असल्याची माहिती मिळाली आणि म्हणूनच डोंगरकापणीच्या विरोधात करणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. येत्या ४८ तासांत डोंगर कापणी वैध असल्याची करणे स्पष्ट न झाल्यास याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

प्रशांत पुरुषोत्तम गावास-देसाई या स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार शेल्डे पंचायत क्षेत्रात सुरु असलेल्या या डोंगरकापणीमुळे निसर्गाची हानी व्हायची. बेकायदेशीरपणे जागोजागी निसर्गाला हानी पोहोचवत जर का माणसाने घरं किंवा मोठमोठाले प्रकल्प उभारायला सुरुवात केली तर यामुळे निसर्गाची दुर्दैवी हानी होईल असे त्यांचे म्हणणे आहे.

गावातील नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलावं लागलं असे ते म्हणाले, सोबतच गोमंतक टीव्हीच्या माध्यमाने ही समस्या उघड व्हायला मदत मिळाली असे म्हणत त्यांनी गोमंतक टीव्हीचे आभार मानले.

काही महिन्यांपूर्वी सोनफातर-शेल्डे येथील हाऊसिंग बोर्डला लागून असलेल्या डोंगराची मोठ्या प्रमाणात कापणी केली होती. या डोंगर कापणीविषयी रविवार, ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी याविषयी पंचायत मंडळाला प्रश्न विचारून त्या जागेवर बांधकाम करण्यास आमचा विरोध असल्याचे सांगितले होते व या जागेची पाहणी करण्याची मागणी केली होती, यानुसार भरारी पथकाने शेल्डे येथील त्या जागेला भेट देऊन पाहणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tilak Varma: आशिया कपमध्ये कमाल, आता तिलक वर्मा करणार कॅप्टन्सी! टीमची झाली घोषणा; पाहा संपूर्ण संघ

BJP Rath Yatra Goa: भाजपतर्फे 25 डिसेंबरपर्यंत रथयात्रा, पदयात्रा; मतदारसंघनिहाय मेळावे होणार, स्वदेशीचा नारा करणार बुलंद

PM Surya Ghar Scheme:'पीएम सूर्य घर मुफ्‍त बिजली'च्या जागृतीला चालना, उत्तर गोवा जिल्हा समन्वय समितीच्‍या बैठकीत निर्णय

Pernem: शेतकऱ्यांसाठी घातक असलेला कायदा बदला, कुळ मुंडकार संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Mhaje Ghar: 'माझे घर'चे अर्ज सोमवारपासून उपलब्ध; योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा, CM प्रमोद सावंतांच्या अधिकाऱ्यांना सूचना

SCROLL FOR NEXT