Kelshi Construction notice Dainik Gomantak
गोवा

केळशीतील बांधकामप्रकरणी कारणे दाखवा नोटीस जारी

सीआरझेड अधिसूचना 2011 च्या उल्लंघनामुळे हे बांधकाम बेकायदेशीर

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने केळशी येथील शेतातील बेकायदेशीर बांधकामांबाबत कारणे दाखवा नोटीस जारी केली असून संबंधित बांधकामे मूळ स्थितीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पर्यावरण (environment) कार्यकर्ते ओस्वाल्ड फर्नांडिस यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षांनी जीसीजीएमने दिलेल्या सूचनांनुसार संबंधित क्षेत्रांची तपासणी केली होती.

याबाबत कारणे दाखवा नोटिस जारी करण्यात अली असून प्राधिकरणाने जिल्हास्तरीय अहवालात सीआरझेड अधिसूचना 2011 च्या उल्लंघनामुळे हे बांधकाम बेकायदेशीर आहे. या बांधकामामुळे भातशेतीचा मोठ्या प्रमाणात नाश झाला आहे असे म्हटल्याची दखल घेतली आहे.

जर एखाद्या इमारतीचे पुन:बांधकाम, (Construction) विकास किंवा दुरुस्ती करायची असल्यास गोवा किनारी क्षेत्र प्राधिकरणाची अधिकृत परवानगी लागेल. संबंधित इमारत नदीपासून 100 मीटर आणि समुद्राच्या 500 मीटरच्या आसपास असेल, तर सीसीजीएमच्या पूर्व मंजुरीची आवश्यकता आहे. सीआरझेड अधिसूचना 2011 च्या अंतर्गत असलेल्या इमारतीचे काम गोवा (goa) किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पूर्व मंजुरीशिवाय पूर्ण केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असे कारणे दाखवा नोटीसीत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT