Kadamba Transport Corporation Dainik Gomantak
गोवा

Kadamba Corporation: कदंब महामंडळाकडून हैदराबादच्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस

Kadamba Corporation: हैदराबाद येथील ऑलेक्ट्रा कंपनीला कदंब वाहतूक महामंडळाला १५० ईव्ही बसगाड्यांचा पुरवठा करण्याची ऑर्डर देण्यात आली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Kadamba Corporation: हैदराबाद येथील ऑलेक्ट्रा कंपनीला कदंब वाहतूक महामंडळाला १५० ईव्ही बसगाड्यांचा पुरवठा करण्याची ऑर्डर देण्यात आली होती. त्यातील ५६ बसगाड्या महामंडळाला मिळाल्या. बाकी ९४ बसगाड्या मे महिन्यापर्यंत पुरवण्याचे कंपनीने सांगितले होते.

मात्र, त्या न दिल्याने कदंब वाहतूक महामंडळाने त्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली असून एक कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती महामंडळाचे चेअरमन तथा आमदार उल्हास तुयेकर यांनी मंगळवारी मडगावात पत्रकारांना सांगितले.

नवीन नियमांप्रमाणे १५ वर्षे झालेली वाहने वापरता येत नसल्याने महामंडळाच्या ५० ते ६० बसगाड्या पडून आहेत. राज्य सरकारने महामंडळाला ५० डिझेलवरील बसगाड्या विकत घेण्याची मंजुरी दिली होती व सध्या या बसगाड्यांच्या बॉडी बांधण्याचे काम सुरू असून दोन-तीन महिन्यांत त्या महामंडळाकडे दिल्या जातील. या बसगाड्यांचा वापर आंतरराज्य मार्गावर केला जाईल, असे आमदार तुयेकर यांनी सांगितले.

उल्हास तुयेकर, कदंब महामंडळाचे चेअरमन तथा आमदार

दारू पिऊन वाहने चालवणाऱ्या बसचालकांवर महामंडळ कडक कारवाई करीत आहे. अशा सात चालकांना निलंबित केले आहे. एका चालकावर ४० ते ५० प्रवाशांची जबाबदारी असते. अशा प्रकारची कारवाई यापुढेही चालू असेल. आम्ही चालकांची वेळोवेळ तपासणी करीत आहोत. अकस्मात तपासणीही केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT