Bicholim News Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: बाजाराच्या दिवशीच भाज्यांचा तुटवडा

ऐन शिगम्यात डिचोलीत गैरसोय : ः पालेभाज्यांच्या दरातही वाढ

गोमन्तक डिजिटल टीम

होळी उत्सवानिमित्त कर्नाटक राज्यातून भाजीची आवक झाली नसल्याने बुधवारी डिचोलीत साप्ताहिक बाजारात भाज्यांचा तुटवडा दिसून येत होता. ऐन शिगमोत्सवात भाज्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय झाली.

भाजीच्या तुटवड्यामुळे बाजारावरही परिणाम झाला. भाज्यांचा तुटवडा असल्याने पालेभाज्यांचे दर काहीसे वाढले होते. कांदा, बटाटे आणि अन्य भाज्यांचे दर मात्र स्थिर होते. होळी उत्सवानिमित्त काल कर्नाटकातील बहूतेक व्यवहार बंद होते अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान, कर्नाटकातून भाज्यांची आवक सुरू झाली असून गुरुवारपासून स्थिती पूर्वपदावर येणार असल्याचे संकेत विक्रेत्यांकडून मिळाले आहेत.

ग्राहकांची वर्दळही कमीच : शिगम्यामुळे बुधवारी आठवडी बाजार फुलणार असा अंदाज होता. मात्र भाज्यांचा तुटवडा होता. बाजारात जी भाजी उपलब्ध होती त्यातील बरीचशी ताजी टवटवीत नव्हती. अपेक्षेप्रमाणे आज दिवसभर बाजारात ग्राहकांची गर्दीही दिसून आली नाही.

सायंकाळी मात्र ग्राहकांची बऱ्यापैकी वर्दळ दिसून येत होती. बहुतांश ग्राहक परप्रांतीय मजूर लोकच होते. शिगमोत्सवामुळे बहुतेकांना घराबाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी दिसली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT