dead bodies found on Palolem Beach Dainik Gomantak
गोवा

Palolem Beach : गोव्यात प्रेमी प्रेमीयुगुलाचा मृत्यू, 'व्हॅलेंटाईन डे' दिवशीच घडलेल्या घटनेने खळबळ

पाळोळे समुद्रकिनाऱ्यावरील घटना, पोलिस अधिक तपास करीत आहेत

Rajat Sawant

Palolem Beach : पाळोळे समुद्रात एका प्रेमी प्रेमीयुगुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठविले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी बारा वाजण्याचा सुमारास एका प्रेमीयुगुलाचा समुद्रात बुडल्याने मृत्यु झाल्याची घटना समोर येत आहे. ही घटना पाळोळे समुद्रात घडली. सुप्रिया दुबे (26) व विभू शर्मा (27) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी जीव रक्षकांच्या मदतीने समुद्रात बुडणाऱ्या प्रेमीयुगुलाला किनाऱ्यावर आणले. यानंतर त्यांना काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोघेही उत्तर प्रदेश येथील असून काही दिवसांपूर्वी पर्यटनासाठी गोव्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी आले होते पर्यटनाला

पोलिसांनी जीवरक्षकांच्या मदतीने या प्रेमीयुगुलाला किनाऱ्यावर आणले. त्यांना काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोघेही उत्तर प्रदेश येथील असून काही दिवसांपूर्वी पर्यटनासाठी गोव्यात आले होते, अशी माहिती पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी दिली.

कुटुंबीय अनभिज्ञ

सुप्रिया ही कामानिमित्त सध्‍या बंगळुरू येथे राहात होती; तर विभू हा दिल्‍लीत वास्‍तव्‍यास होता.

हे द्वयी एकमेकांचे नातेवाईक होते, अशी माहिती समोर आली आहे.

ते गोवा येथे आल्‍याविषयी त्‍यांचे कुटुंबीय अनभिज्ञ होते. विभू शर्मा हा व्‍हॉगर होता. त्‍याला नाट्यकलेचीही आवड होती.

पोलिसांनी मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगाव येथील हॉस्पिसियु रुग्णालयात पाठवून दिले आहेत. अद्याप मृतांचा तपशील हाती आला नसून पोलिस अधिक तपास करीत आहेत. याबाबतची माहिती पोलिस निरिक्षक चंद्रकांत गावस यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cabinet Decisions: 'बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक विधेयका'ला सरकारकडून मंजुरी, आरोपींना जन्मठेपेसह 50 हजारांच्या दंडाची शिक्षा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

VIDEO: मृतांचा आकडा 160 हून अधिक, 750 पेक्षा जास्त बेपत्ता! 130 भारतीयांचा समावेश; नेपाळमधील विनाशकारी पुरामागचं नेमकं कारण काय?

India vs Sri Lanka Test: भारत-श्रीलंका टेस्टचा थरार निर्णायक वळणावर! अखेरच्या दिवशी शुभमन गिलसमोर मोठं आव्हान, विजयासाठी काय असेल रणनीती?

Horoscope: ग्रहांची साथ मिळणार अन् आर्थिक स्थिती सुधारणार! मेष-तुळ राशीला लाभाचे संकेत, मिथुनसह 'या' राशींनी मोठे निर्णय टाळावेत

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

SCROLL FOR NEXT