Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Suicide Case: रोहित हा आपल्या जवळच्या महिला नातेवाईकासोबत राहत होता. घरात वाद झाल्यानंतर त्याने स्वतःच्या पोटात चाकू भोसकून घेतला.

गोमंतक ऑनलाईन टीम

शिवोली: राय-शिवोली येथे संजय गोवेकर यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहणाऱ्या रोहित जळगांवकर (वय २६, रा. पुणे, महाराष्ट्र) या तरुणाने शुक्रवारी सकाळी स्वतःच्या पोटात चाकू भोसकून घेत आत्महत्या केली.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी घरगुती वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. रोहित हा आपल्या जवळच्या महिला नातेवाईकासोबत राहत होता. घरात वाद झाल्यानंतर त्याने स्वतःच्या पोटात चाकू भोसकून घेतला. गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच शिवोली आऊटपोस्टचे हवालदार रुपेश शेटगावकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी हणजूण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक किनळेकर अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT