Shivling Waterfall Goa : पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन पाली, सत्तरी येथील शिवलिंग धबधब्यावर दर्जेदार सुविधा विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. येत्या पंधरा दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे. येथील वन सफरींवर वन खात्याची देखरेख राहणार असून धबधब्यांवर सुरक्षेसाठी लाईफगार्ड्स तैनात असणार आहेत.
वन खात्याने निश्चित केलेल्या ट्रेकिंग मार्गांवरूनच प्रवेश करण्यास मुभा असेल. या मार्गात आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जातील, असे वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.
सत्तरीतील डोंगुर्ली, ठाणे येथे युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया, राज्य शाखा आणि वन खात्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या ‘नॅशनल गोवा मॉन्सून ट्रेकिंग प्रशिक्षण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी राणे बोलत होत्या. यावेळी युथ हॉस्टेल राज्य अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर, ठाणे-डोंगुर्लीचे सरपंच नीलेश परवार आदी उपस्थित होते.
सिद्धार्थ कुंकळकर म्हणाले की, तब्बल १३ वर्षांपूर्वी या साहसी पावसाळी ट्रेकिंग मोहिमेला सुरवात झाली आणि आजपर्यंत याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सूत्रसंचालन युथ हॉस्टेलचे प्रवीण सबनीस यांनी केले. रूपा नायर यांनी आभार मानले.
सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी सांगितले की, आजपासून सुरू झालेली ही ट्रेकिंग मोहीम पुढील एक महिना चालणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील या ट्रेकिंग मोहिमेत एकूण ६०० ते ७०० पर्यटक सहभागी होतील. एका गटात सुमारे ६० ते ६५ ट्रेकर्सचा समावेश असणार आहे. यंदा सत्तरीतील पाली, हिवरे, चरावणे, नानेली, शिंगणे व इतर प्रसिद्ध धबधबे पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.
आमदार दिव्या राणे यांनी सांगितले की, युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया देशभरात तरुणांना साहसी पर्यटन, ट्रेकिंग आणि जबाबदारीपूर्ण पर्यटन संस्कृती रुजविण्यासाठी नेहमीच सक्रिय राहिला आहे. या मोहिमेद्वारे पुन्हा एकदा तरुणपिढीत निसर्गप्रेम, शिस्त आणि सुरक्षित ट्रेकिंगची जाणीव जागृत केली जात आहे. सत्तरीत साहसी ट्रेकिंग सुरू होत असल्याने खूप आनंद होत आहे, असे त्या म्हणाल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.