Shivamogga-Goa Flight Dainik Gomantak
गोवा

Shivamogga-Goa Flight: 'या' दिवशीपासून सुरू होणार शिवमोग्गा-गोवा फ्लाईट; उडान योजनेंतर्गत स्टार एअर देणार सेवा

शिवमोग्गा विमानतळावरून तिरुपती, हैदराबाद फ्लाईटही होणार सुरू

Akshay Nirmale

Shivamogga-Goa Flight: कर्नाटकातील शिवमोग्गा विमानतळावरून गोव्याला जोडणारी विमानसेवा 21 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येत आहे. याशिवाय शिवमोग्गा ते हैदराबाद आणि शिवमोग्गा ते तिरूपती या फ्लाईट्सनाही सुरवात होणार आहे.

UDAN-RCS योजनेंतर्गत मंजूर केलेले तीन मार्ग स्टार एअरतर्फे चालवले जात आहेत. 31 ऑगस्टपासून इंडिगो एअरलाइन्स बेंगळुरू-शिवमोग्गा मार्गावर कार्यरत आहेत.

स्टार एअरने आणखी तीन मार्ग सुरू केल्यामुळे, शिवमोग्गा विमानतळावरून आता बेंगळुरू, हैदराबाद, गोवा आणि तिरुपतीला प्रवाशांना जाता येईल.

शिवमोग्गाचे लोकसभा खासदार बी. वाय. राघवेंद्र म्हणाले की, लवकरच नवी दिल्लीसाठीदेखील फ्लाईट सुरू केली जाईल. बेंगळुरूला जाणार्‍या फ्लाइटची सरासरी 78 ते 79 टक्के इतकी आहे. यावरून विमानतळाची क्षमता दिसून येते. येत्या काही दिवसांत विमानतळावरून उड्डाणांची संख्या वाढेल.

नवीन मार्गांना प्रवाशांच्या प्रतिसादाबद्दल ते म्हणाले की, “पहिल्या फ्लाइटने तब्बल 63 लोक तिरुपतीला जात आहेत. आणखी 25 लोक तिरुपतीहून शिवमोग्गा येथे परतणार आहेत. 43 जण हैदराबादहून शिवमोग्गाला तर 41 जण शिवमोग्गाहून हैदराबादला जाणार होते.

55 जण गोव्याला जाणार आहेत तर 33 जण गोव्यातून परतणार आहेत. जर आम्ही बेंगळुरूला जाणाऱ्यांचा समावेश केला तर दररोज सुमारे 400 प्रवासी शिवमोग्गा येथील विमानतळाचा लाभ घेत आहेत.”

डिसेंबरपर्यंत नाईट लँडिंग

दरम्यान, या विमानतळावर फ्लाइट ऑपरेशन सुरू झाल्यापासून, तांत्रिक कारणांमुळे लँडिंग तीन वेळा रद्द करण्यात आले. व्हिज्युअल फ्लाइट नियम (VFR) संदर्भात काही समस्या आहेत. थंडीच्या मोसमात दृश्यमानता कमी असल्याने विमानसेवा प्रभावित झाली आहे.

या समस्येकडे लक्ष दिले जात आहे. ते लवकरच सोडवले जातील आणि नाईट लँडिंग सुविधा डिसेंबरपर्यंत कार्यान्वित होईल, असेही त्यांनी सांगतिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT