Shivaji Maharaj Statue Vandalised Karaswada-Acoi Mapusa Goa Dainik Gomantak
गोवा

'त्यांना वाद हवा असेल तर आम्ही तयार आहोत, फक्त हिंदूनीच संयम बाळगायचा का?' करासवाडा घटनेवरून मंत्री फळदेसाई संतप्त

'धर्मांतरण केले ते देव अन् शिवरांयाची फेरी अनावश्यक खर्च म्हणतात'- मंत्री फळदेसाई

Pramod Yadav

Shivaji Maharaj Statue Vandalised Karaswada-Acoi Mapusa Goa: करासवाडा-आकय येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून विटंबना करण्यात आली. रात्रीच्या सुमारास घडलेली ही घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. घटनेचा सर्वस्तरातून निषेध होत असताना आमदार, मंत्री याबाबत विविध प्रतिक्रिया देत आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अशा घटना नियोजित असून, राज्यातील एकोपा आणि शांती भंग करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. तर, मंत्री सुभाष फळदेसाई यांनी यावरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

करासवाडा-आकय येथील घटनास्थळी सकाळपासून विविध नेते भेट देत आहेत. नुकतेच, सामाजिक न्याय आणि पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

"गोव्यात धर्मांतरण केलेल्या लोकांना आपण देव मानतो पण छत्रपती शिवाजी महारांजांची ज्यावेळी फेरी काढली जाते तर त्याला अनावश्य खर्च म्हणतात. साहशे वाहनांसह जवळपास तीस किलोमीटर काढलेल्या फेरीचा सर्व खर्च मी स्वत: केला होता तो सरकारचा नव्हता." अशा शब्दात मंत्री फळदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली.

"आम्हाला सरकारकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत नको आहे. पण, आमच्या भावना दुखवू नका. समोर आलेल्या व्हिडिओनंतर पोलीस कारवाई करणार आहेत का?" असा सवाल देखील फळदेसाई यांनी उपस्थित केला.

"जर त्यांना वाद हवा असेल तर आम्ही तयार आहोत फक्त हिंदू लोकांनीच संयम का बाळगावा?" असाही प्रश्न फळदेसाई यांनी केला.

विधानसभेत क्रुझ सिल्वा यांनी उपस्थित केला होता प्रश्न

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात बाणावलीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी शिवजयंतीवर केलेल्या खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, असे अनावश्यक खर्च कमी करण्याबाबतही वक्तव्य केले होते.

त्यावेळी मंत्री फळदेसाई यांनी सिल्वा यांना उत्तर देताना शिवरायांच्या राज्यातील योगदानाचा आणि स्थान याचा संदर्भ दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT