शिवसेनेचे (Shivsena) खासदार तथा गोव्याचे संपर्क नेते संजय राऊत यांनी उपासनगर सांकवाळ येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या सभेत उपस्थिती लावली. Dainik Gomantak
गोवा

जास्तीत जास्त महिलांना उमेदवारी देण्यावर शिवसेनेचा भर

आम्ही जास्तीतजास्त महिलांना (Women) उमेदवारी देण्यावर भर देऊ,असे सांगताना त्यांनी कुठ्ठाळी मतदार संघातून शिवसेनेतर्फे भक्ती खडपकर (Bhakti Khadapkar) या उमेदवार असतील, असे जाहीर केले.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: शिवसेना (Sivsena) हा राजकीय पक्ष नसून एक मंत्र आहे. शिवसेना या चार शब्दांमध्ये जी ताकद आहे ती इतर राजकीय पक्षांमध्ये नसल्याचे शिवसेनेचे खासदार तथा गोव्याचे संपर्क नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपासनगर सांकवाळ येथे गुरुवारी शिवसेना कार्यकर्त्यांच्या सभेत स्पष्ट केले. आम्ही २२ जागा लढविणार आहोत, त्यापैकी चार आमदार विधानसभेत पाठवा आम्ही स्थानिकांना शंभर टक्के नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. आम्ही जास्तीतजास्त महिलांना (Women) उमेदवारी देण्यावर भर देऊ,असे सांगताना त्यांनी कुठ्ठाळी मतदार संघातून शिवसेनेतर्फे भक्ती खडपकर (Bhakti Khadapkar) या उमेदवार असतील, असे जाहीर केले.

याप्रसंगी काहीजणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. राऊत, यांनी त्यांचे स्वागत केले. स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापन केली होती. स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावे यासाठी शिवसेनेचे काही आमदार विधानसभेत पाठवा असे राऊत म्हणाले. शिवसेनेचे 25 खासदार आहेत, ही लहान गोष्ट नाही. शिवसेना जे काही ठरवील ते दिल्लीत होते असे त्यांनी स्पष्ट केले. गोव्याला वाचविण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. एक संधी द्या. विधानसभेत शिवसेनेचे आमदार असतील हे लक्ष्य ठेवा, असे आवाहन राऊत यांनी केले.गत विधानसभा निवडणुकीत आम्ही इतर पक्षाकडे आघाडी केली होती.परंतु, जेथे आमचे कार्य व कार्यकर्ते नव्हते त्या तीन जागा आम्हाला देण्यात आल्या होत्या.आता आम्ही स्वबळावर २२ जागा लढविणार आहोत. कुठ्ठाळी भागात आमचे कार्य असल्याने सदर जागेवर आमचा उमेदवार असेल.आम्ही पक्षाचा विस्तार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

1 November Rules Change: गॅस सिलिंडरपासून पेन्शनपर्यंत! 1 नोव्हेंबरपासून बदलणार 6 महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

Ranji Trophy: 6 बाद 84 वरुन गोव्याचे शानदार कमबॅक! दर्शन-यशची शतकी भागीदारी; पहिल्या दिवसाअखेर संघाने ओलांडला द्विशतकाचा टप्पा

Viral Video: चहा विकून महिन्याला 9 लाखांची बक्कळ कमाई! चहावाल्यानं सांगितलं यशाचं गमक; म्हणाला, 'PM मोदींच्या संघर्षातून घेतली प्रेरणा...'

Asgaon Water Crisis: आसगाव ग्रामसभेत पाणीटंचाईचा मुद्दा गाजला; बहुमजली प्रकल्पांना विरोध करत ग्रामस्थांचा एल्गार, अपुऱ्या पावसामुळे पाण्याचे दुर्भीक्ष

Colvale Central Jail: पाणीटंचाई, तुटलेली गटारे आणि डासांचा प्रादुर्भाव, कोलवाळ कारागृहात मानवाधिकार आयोगाची अचानक धडक; कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT