Sanjay Raut news | Sanjay Raut On Goa Politics  Dainik Gomantak
गोवा

गोव्याचे राजकारण फार विचित्र; संजय राऊत यांचा टोला

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी गोव्याच्या राजकारणावरच टिका केली आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यात विधनसभा निवडणुका पार पडल्या, दरम्यान 15 मार्च रोजी विशेष अधिवेशन पार पडणार असुन या अधिवेशन दरम्यान राज्यातील नविन आमदारांचा शपथविधी होणार आहे. राज्यात शिवसेना पक्ष मोठ्या ताकतीने उतरला होता. मात्र शिवसेना एकही जागा जिंकू शकला नाही. या मुद्द्यावर मौन सोडत संजय राऊत यांनी गोव्याच्या राजकारणावरच टिका केली आहे.(Shiv Sena leader Sanjay Raut has criticized Goa's politics.)

ते म्हणाले, गोव्याचे राजकारण (Goa Politics) हे साधं सोपं गणित नसून ते कोणाच्याही हाताला लागत नाही, आमचे मित्र देवेंद्र यांच्या उत्तम नेतृत्वामुळे गोव्यात भाजपची (Goa BJP) सत्ता पुन्हा नव्याने स्थापन झाली, त्याचे अनेक ठिकाणी कौतुक झाले. विधान भवनात त्यांचे जल्लोशात स्वागत केले. आम्हालाही अभिमान वाटला की महाराष्ट्राचा नेता गोवा जिंकून आला पण गोवा सहजासहजी कोणालाही जिंकता येत नाही; गोव्याचे राजकारण फार विचित्र आहे गोव्यामध्ये कधीही पक्ष जिंकत नाही गोव्यामध्ये नेहमी व्यक्ती जिंकतो आणि नंतर त्यातल्या काही व्यक्ती एकत्र येऊन आपले सरकार बनवतात असे ते म्हणाले. (Sanjay Raut news)

ते पुढे म्हणाले, गोव्यात (Goa) निवडणूकीनंतर नेहमीच वाद होतो आपण पाहिले असेल उत्पल पर्रीकर यांचा पराभव झाला आणि बाबूश मोन्सेरात जिंकुन आले त्यांनी सांगितले की माझ्या विजयामध्ये भारतीय जनता पार्टी चा काही सहभाग नाही असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विश्‍वजित राणे देखील भाजपच्या तिकिटावर आले असले तरी त्यांना कोणत्याही पक्षाची गरज नाही असेही ते म्हणाले असे अनेक लोक आहेत. गोवा लहान राज्य असल्यामुळे इथे पक्षा पेक्षा त्या त्या भागातल्या व्यक्तीचे महत्त्व जास्त असल्याचे असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

High Court: "सनातन संपवण्याची भाषा म्हणजे नरसंहाराला चिथावणी" निवडणूक वर्षात उदयनिधि स्टालिन यांना हायकोर्टाकडून चपराक!

"मुक्या प्राण्यांच्या जिवाची इतकीच किंमत का?" मर्सिडीजनं कुत्र्याला चिरडलं, कोर्टानं केली 150 रुपयांत सुटका! प्राणीप्रेमींचा संताप

NH66 Highway Goa: राष्ट्रीय महामार्ग 66 बाबत नवीन अपडेट! रुंदीकरणाचे काम होणार सुरु; 764 कोटी मंजूर

Terror Attack: 'या' इस्लामिक देशात नरसंहार! 31 निष्पाप नागरिकांची गोळ्या झाडून हत्या; लष्करी राजवटीत हिंसाचाराचा उद्रेक

Goa Russian Murder: एकाच नावाच्या दोन रशियन महिलांची का केली हत्या? मारेकऱ्याच्या आईशी कनेक्शन! खुनाचं गुढ उकललं!

SCROLL FOR NEXT