Aditya Thackeray Dainik Gomantak
गोवा

Goa Election 2022: आदित्य ठाकरे उद्या गोवा दौऱ्यावर

शिवसेना नेते आदित्य ठाकरे शुक्रवारपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत.

दैनिक गोमन्तक

गोवा विधानसभा निवडणुक 2022चे मतदान चार दिवसांवरती येऊन उभे ठाकलेले असताना महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) शुक्रवारपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ठाकरे वास्को (Vasco), पेडणे (Pernem), साखळी (Sanquelim) येथे सभा घेऊन शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. (Aaditya Thackeray Visit Goa tomorrow)

शुक्रवारी दुपारी 2.30 वाजता आदित्य ठाकरेंचे दाबोळी विमानतळावर आगमन होणार आहे. दुपारी 3 वाजता ते वास्को येथील सभेला संबोधित करणार आहेत. तर, सायंकाळी 5.15 वाजता पेडणे येथील सभेला संबोधित करतील.

शनिवारी सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर दुपारी 2 वाजता त्यांची साखळीत सभा होणार आहे. तर सायंकाळी 4 ते 4.30 या वेळेत ते म्हापसा (Mapusa) बाजारपेठ परिसरात घरोघरी भेट देऊन प्रचार करतील.

या दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) लढवत आहे. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) या दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व युती केली असून, शिवसेनेने पेडणे, शिवोली, म्हापसा, साखळी, मांद्रे, हळदोणा, पर्ये, वाळपई, वास्को, केपे आणि कुठ्ठाळी या 11 मतदारसंघांत उमेदवार उतरवले आहेत. शिवसेनेने पणजीतही उमेदवार दिला होता. पण, पणजीतून माघार घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेल्या माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे सुपूत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT