Shivaji Maharaj statue Dainik Gomantak
गोवा

Sao Jose De Areal: शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सां जुझे दी आरियालमध्ये पुन्हा वाद; कुंपण तोडल्यावरुन शिवप्रेमी ग्रामस्थ आमने सामने

Shivjayanti In Goa: खासगी वाटेवर उभारण्यात आलेले कुंपण पाडण्यात आल्याने जागा मालक आणि ग्रामस्थांनी याला आक्षेप घेतला.

Pramod Yadav

सासष्टी: शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सां जुझे दी आरियामध्ये पुन्हा वाद झाला आहे. खासगी वाटेवरील कुंपण हटवल्यामुळे शिवप्रेमी आणि ग्रामस्थ आमने सामने आल्याची घटना सोमवारी घडली. शिवजयंतीसाठी खासगी वाटेवरुन जागा देण्यास नकार दिल्याने शिवप्रेमी काहीसे आक्रमक झाल्याचे दिसून आले. अखेर पोलिस आणि स्थानिक आमदार क्रूझ सिल्वा यांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली.

सां सुझे दी आरियाल येथील बेनाभाट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्यावरुन गेल्या वर्षी मोठा वांदग झाला होता. समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर दगडफेक देखील झाली होती. दरम्यान, यावर्षी देखील शिवजयंतीच्या पूर्वी सोमवारी येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. खासगी वाटेवरील कुंपण हटवल्याने यावेळी शिवप्रेमी आणि ग्रामस्थांमध्ये वादाची ठिणगी पडली.

खासगी वाटेवर उभारण्यात आलेले कुंपण पाडण्यात आल्याने जागा मालक आणि ग्रामस्थांनी याला आक्षेप घेतला. मोठ्या संख्येने नागरिकांनी शिवरायांच्या पुतळ्याजवळ गर्दी केली. शिवजयंतीला आक्षेप नाही पण, त्यासाठी खासगी जागेचा वापर करण्यास मालकाकडून नकार देण्यात आला, यावरुन शिवप्रेमी नाराज झाले. अखेर पोलिस आणि आमदार क्रूझ सिल्वा यांनी मध्यस्थी केली.

पर्यायी मार्ग तयार

जागा मालकाने मार्गाचा वापर करण्यास नकार दिल्यानंतर शिवजयंतीसाठी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला व यानंतर वादावर पडदा पडला. दरम्यान, बाहेरची लोक गावात येऊन येथील शांतता भंग करतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच, कुंपण तोडले नसते तर वादच झाला नसता, असे मत आमदार सिल्वा यांनी व्यक्त केले.

गेल्या वर्षी शिवजयंतीला वाद

सां सुझे दी आरियाल येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्यावरुन गेल्यावर्षी येथे मोठा वाद झाला होता. ग्रामस्थांनी या पुतळ्याला विरोध केला होता. दरम्यान, शिवजयंतीच्या निमित्ताने याचे अनावरण करण्यासाठी आलेल्या मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर दगडफेक देखील झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT