Land in Goa
Land in Goa  Gomantak Digital Team
गोवा

Sircaim Gram Sabha : जमीन ताब्यात का घेतली नाही? नागरिकांच्या प्रश्नानंतर सभेत गोंधळ

गोमन्तक डिजिटल टीम

थिवी मतदारसंघातील शिरसई कोमुनिदादने 25 वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीला दिलेली सुमारे पाच हजार चौरस मीटर जमीन पंचायतीने अद्याप आपल्या ताब्यात का घेतली नाही असा प्रश्न हेमंत कांबळी, विद्याधर भगत, लक्ष्मीकांत कामत, उमाकांत कुडणेकर यांनी नुकत्याच झालेल्या शिरसई ग्रामसभेत उपस्थित केला. यावर सरपंच दया फडते उत्तर देऊ न शकल्यामुळे ग्रामसभेत गोंधळ झाला.

पंचायत मंडळाने कोमुनिदाद जमिनीचे सोपस्कार करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. मात्र, पंचायत मंडळ या समितीला विश्वासात घेत नसल्यामुळे हे काम रखडले आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. यावर सरपंच फडते यांनी संबंधित समिती व पंचायत मंडळाची लवकरच बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी उपसरपंच रुपेश मडगावकर,पंच नीलेश कांबळे, राजाराम पार्सेकर, मेशा कुडणेकर सिमरन उस्कळीकर, गोकुळदास कानुळकर, सचिन नाईक उपस्थित होते. निरीक्षक म्हणून गटविकास अधिकारी कार्यालयातील चेतन साळगावकर यांनी काम पाहिले.

पंचायत क्षेत्रात रस्ता अपघात रोखण्यासाठी काही ठिकाणी गतिरोधक घालण्याची मागणी केली होती. तीन ठिकाणी गतिरोधक घातले आहेत, पण शाळेच्या ठिकाणी गतिरोधक घालण्याची गरज असल्याचे लक्ष्मीकांत कामत, उमाकांत कुडणेकर यांनी सांगितले. शिरसईतील मेगा प्रकल्पाला कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत योग्य तरतूद न करता रहिवासी दाखला का दिला असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.

कचरापेट्या देण्याची मागणी

घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी ५०० रुपये कचरा कर घेण्यात आला असून पंचायतीतर्फे कचरापेट्या देण्यात आल्या नाहीत. त्यावर सरपंच फडते यांनी त्या देण्यात येतील असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप लोकांना कचरापेट्या का दिल्या नाहीत असा प्रश्न मनोज हळदणकर व फ्रान्सिस डिसोझा यांनी उपस्थित केला. कचरापेट्या लवकरच देण्यात येतील, असे आश्वासन सरपंचानी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT