Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

Futsal Goa: फुटसाल स्पर्धा; कॉर्बेट एफसीने २०२२ मधील विजेत्या दिल्ली एफसीचा ११-१ असा धुव्वा उडविला.
गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश
Futsal Goa

गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबने गतविजेत्या मिनर्व्हा अकादमीला पराभवाचा धक्का देत एआयएफएफ फुटसाल क्लब स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांची गाठ आता कॉर्बेट एफसी संघाशी पडेल.

गुजरातमधील बडोदा येथील स्वर्णिम गुजरात क्रीडा विद्यापीठ संकुलात स्पर्धा सुरू आहे. कॉर्बेट एफसीने २०२२ मधील विजेत्या दिल्ली एफसीचा ११-१ असा धुव्वा उडविला. अन्य एका उपांत्यपूर्व लढतीत मिझोराममधील दोन्ही संघांत एफसी थिरीस्टोर संघाने इलेक्ट्रिक वेंग फुटसाल क्लबला ६-३ फरकाने नमविले.

बुधवारी झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत आंबेली क्लबने मिनर्व्हा अकादमीला ८-२ फरकाने हरविले. गोव्यातील संघासाठी फ्रेडसन मार्शल (६, ३४वे मिनिट) व रोनाल्डो परेरा (२८ व २९वे मिनिट) यांनी प्रत्येकी दोन गोल केला, तर क्लाईव मिरांडा (१३वे मिनिट), मायकल सिल्वा (१७वे मिनिट), लिंडन कार्दोझ (३०वे मिनिट) व फ्रेझर कार्दोझ (३३वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

मिनर्व्हा अकादमीसाठी सॅमसन केईशिंग (३४वे मिनिट) व थोंगखोंगमायुम नाओबा (४०वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com