Shirgaon Lairai Jatra in Goa Dainik Gomantak
गोवा

मोठी बातमी; शिरगावच्या जत्रेची तारीख ठरली

अधिकाऱ्यांच्या बैठकीत पूर्वतयारीचा आढावा, 9 मेपर्यंत कौल उत्सव

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यातील प्रसिद्ध असलेल्या शिरगावच्या यात्रेची तारीख अखेर निश्चित झाली आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि लाखो भक्तगणांचं आराध्यदैवत असलेल्या शिरगावच्या लईराईचा जत्रोत्सव येत्या मे महिन्यात होणार आहे. कोरोना निर्बंधांमुळे मर्यादित स्वरुपात ही जत्रा होत होती.

शिरगावच्या लईराई देवीची जत्रा 5 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. लईराई देवीचे देश-विदेशात असंख्य धोंड भक्तगण आहेत. यात्रेची तारीख ठरल्याने धोंडांसह भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. आज गुरुवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जत्रेची पूर्वतयारी व्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली असून सर्व आवश्यक बाबींवर यावेळी निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांपासून शिरगावच्या लईराईची जत्रा मर्यादित स्वरुपात साजरी केली जात होती. भक्तांना शिरगावात येण्यासाठी निर्बंधही लादण्यात आले होते. मात्र यावर्षी प्रथमच भक्तांना जत्रेमध्ये सहभागी होता येणार आहे. जत्रा होणार असल्याने भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. होमखणासाठी लागणारी लाकडंही आणण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. देवस्थान समितीही जत्रेसाठी तयारीला लागली आहे. 5 मेपासून ही जत्रा सुरु असेल, तर 9 मे पर्यंत कौल उत्सव साजरा केला जाणार आहे.

दरम्यान गुरुवारी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांच्यासोबत देवस्थान समिती आणि पंचायत सदस्यांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर तसंच पोलीस अधिकारी, वाहतूक पोलीस यासह महत्त्वाच्या खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जत्रेची तयारी आणि व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

Goa Crime: तब्बल दोन वर्षांनी होणार 'त्या' महिलेवर मडगावात अंत्यसंस्कार; पोलीस बंदोबस्तात अंतिम विधी, वाचा नेमकं प्रकरण काय?

IND vs AUS ODI: कांगारुंच्या भूमीवर 'हिटमॅन' किंग! कसा आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हेड-टू-हेड रेकॉर्ड? रोहित-विराट गाजवणार पर्थचं मैदान

SCROLL FOR NEXT