Lairai Jatrotsav Dates Dainik Gomantak
गोवा

Lairai Jatra Shirgao: तारीख ठरली! लईराई देवीचा जत्रोत्सव 21 एप्रिल रोजी; 25 पर्यंत रंगणार पारंपरिक कौलोत्सव

Lairai Jatrotsav Dates: शिरगावची श्री लईराई देवी म्हणजे भक्तांचे श्रद्धास्थान. भक्तांच्या हाकेला पावणारी देवी, अशी या देवीची ख्याती आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगावच्या श्री लईराई देवीची जत्रा यंदा २१ एप्रिल रोजी होणार आहे. तर २२ ते २५ एप्रिलपर्यंत पारंपरिक कौलोत्सव होणार आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी ही माहिती दिली.

शिरगावची श्री लईराई देवी म्हणजे भक्तांचे श्रद्धास्थान. भक्तांच्या हाकेला पावणारी देवी, अशी या देवीची ख्याती आहे. लईराई देवीचे गोव्यासह शेजारील अन्य राज्यांत मिळून ६० हजारांहून अधिक धोंड भक्तगण आहेत.

जत्रोत्सवाच्या काळात गोमंतकासह देश-विदेशातील मिळून लाखो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी शिरगावात येतात. मात्र, गेल्या वर्षी घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर यंदा प्रशासन आणि देवस्थान समिती सतर्क झाली आहे.

गेल्या वर्षीची पुनरावृत्ती टाळून जत्रा निर्विघ्नपणे साजरी व्हावी, यासाठी विविध उपाय योजण्याचे काम सध्या सुरू आहे. जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवरही बैठका घेण्यात येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

Ponda Water Problems: फोंड्यात 15 दिवसांत पुरेसे पाणी मिळणार? जनता दरबारात सुभाष शिरोडकरांचा शब्द

Gold Mine Accident: "मदतीसाठी आक्रोश अन् चिखलाने माखलेले मृतदेह!" सोन्याची खाण ठरली मृत्यूचा सापळा; 30 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT