Lairai Jatra Dainik Gomantak
गोवा

Lairai Jatra: 'ती' दुकाने 38 तास बंद ठेवण्‍याचे आदेश, केवळ मंजुरी मिळालेलीच दुकाने राहणार सुरू, आदेशांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई

Shirgao Lairai Jatra: शिरगाव येथील श्री लईराई देवी जत्रोत्‍सवातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (डीडीएमए) कडक निर्बंध लागू केले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: शिरगाव येथील श्री लईराई देवी जत्रोत्‍सवातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (डीडीएमए) कडक निर्बंध लागू केले आहेत.

जत्रेचा संपूर्ण परिसर सहा कार्यक्षेत्रांमध्ये विभागण्यात आला असून, त्‍यात येणारे स्टॉल्स, दुकाने, हॉटेल्स तसेच व्यावसायिक आस्थापने २१ एप्रिलच्‍या सायंकाळी ६ पासून ते २२ एप्रिलच्‍या सकाळी ८ वाजेपर्यंत बंद करण्‍याचे निर्देश जारी केले आहेत. परंतु, उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि ‘डीडीएमए’च्‍या अध्यक्षांनी १० एप्रिल २०२६ रोजीच्या पूर्वीच्या आदेशान्वये ज्या स्टॉल्सना विशेष मंजुरी दिली आहे, त्यांना विहित अटींच्या अधीन राहून कामकाज करण्याची परवानगी असेल.

मंदिराचा परिसर, होमखंड क्षेत्र, मुख्य तळी, प्रतीक्षा क्षेत्रे, मंदिराकडे जाणारे रस्ते आणि लगतच्या सार्वजनिक जागा यांचा कार्यक्षेत्रांमध्‍ये समावेश करण्‍यात आला असून, या परिसरातील स्टॉल्स, दुकाने, हॉटेल्स तसेच व्यावसायिक आस्थापने २१ एप्रिलच्‍या सायंकाळी ६ पासून ते २२ एप्रिलच्‍या सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहतील.

पण, उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि ‘डीडीएमए’च्‍या अध्यक्षांनी १० एप्रिल २०२६ रोजीच्या पूर्वीच्या आदेशान्वये ज्या स्टॉल्सना विशेष मंजुरी दिली आहे, त्यांना मात्र विहित अटींच्या अधीन राहून स्‍टॉल्‍स सुरू ठेवता येईल, असे डिचोली उपजिल्‍हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्‍या आदेशात म्‍हटले आहे.

जिल्‍हाधिकारी प्रशासनाने यावेळी गर्दीवरील नियंत्रणास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्‍यामुळेच कडक नियम जारी करण्‍यात आले आहेत. निर्बंध लागू असलेल्या क्षेत्रांमध्ये आणि नमूद केलेल्या वेळेत कोणत्याही प्रकारची विक्री, सेवा पुरवणे, स्वयंपाक करणे, वस्तूंचा साठा करणे, वस्तूंचे प्रदर्शन मांडणे किंवा ग्राहकांना प्रवेश देणे या गोष्टींनाही सक्‍त मनाई करण्यात आली आहे, असेही आदेशात नमूद करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT