शिमगोत्सव Dainik Gomantak
गोवा

सावईवेरे परिसरात शिमगोत्सवास प्रारंभ

माडक - कावंगाळ येथील 'मांड' येथील तुळशीवृंदावन प्रांगणात धार्मिक कार्यक्रमांनी उत्सवास प्रारंभ झाला.

दैनिक गोमन्तक

सावईवेरे: सावईवेरे परिसरातील शिमगोत्सवास गेल्या नवमी पासून प्रारंभ झाला असून शिमगोत्सवाची समाप्ती शुक्रवार दि. 18 रोजी होलिकोत्सव व धुलीवंदनाने होणार आहे.यानिमित्त शुक्रवारी नवमी उत्सव पार पडला. या दिवशी रात्री 10 वाजता माडक - कावंगाळ येथील 'मांड' येथील तुळशीवृंदावन प्रांगणात धार्मिक कार्यक्रमांनी उत्सवास प्रारंभ झाला. तेथून ढोल-ताशांच्या गजरात मेळास प्रारंभ झाला.

गावातील मेळ 11 वाजता सातेरी देवस्थानच्या प्रांगणात आल्यानंतर मंडपात सचित पालकर यांच्या गाऱ्हाण्याचा कार्यक्रम पार पडला. श्री सातेरी देवीस आरत्या व तीर्थप्रसाद वाटप झाल्यानंतर परंपरागत जोत म्हणण्यात आली व तेथून ढोल-ताशांच्या गजरात सर्व ग्रामस्थ श्री अनंत देवस्थानच्या मंडपात एकत्र आले. श्रींच्या आरती व तीर्थप्रसादाने नवमीची सांगता झाली. नवमीपासून शिमगोत्सव सुरू झाला असून गावात रोज रात्री मेळ फिरणार आहेत. बुधवारी म्हार्दोळ शिमगोत्सवात येथील मेळाचा सहभाग असेल. गुरुवारी सावईवेऱ्यात पौर्णिमेचा सोहळा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT