Shigmotsav  Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav 2023 : नार्वेत तब्बल 25 वर्षांनंतर साजरा होतोय शिगमोत्सव

गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Shigmotsav 2023 : डिचोली तालुक्यातील नार्वे गावात तब्बल 25 वर्षांनंतर यंदा शिगमोत्सव पाहायला मिळणार आहे. त्‍यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावातील देऊळवाडा, मुर्डीवाडा, तारवाडा, गावकरवाडा या चारही वाड्यांवरील लोकांनी विशेषत: युवकांनी पुढाकार घेऊन श्री शांतादुर्गा कणकेश्वरी देवीकडे प्रसाद घेतला. देवीने सकारात्मक कौल दिल्याने शिगमोत्सवाचा मार्ग मोकळा झाला.

काही कारणास्तव सुमारे 25 वर्षांपूर्वी नार्वे गावातील पारंपरिक शिगमोत्सव बंद झाला होता. तो पुन्हा सुरू करण्याचे अधूनमधून प्रयत्नही झाले, पण त्यात यश आले नव्‍हतं. शिगमोत्सवात नारळ फोडण्याची परंपरा आहे, जी नुकतीच 1 मार्चला पार पडली.

गडे उत्सव आज शनिवारी मध्यरात्री सुरू झाला आणि तो सोमवार दि. 6 तारखेपर्यंत चालणार आहे. त्‍या दिवशी होळी साजरी केली जाईल.

"तब्‍बल 25 वर्षांनंतर नार्वे गाव शिगमोत्सवात न्हाऊन निघत आहे आणि प्रत्येकासाठी हा आनंददायी अनुभव आहे. गावात उत्‍साही वातावरण आहे. नववधूंसह सर्व लोक या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. हे केवळ देवीच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले."

- संदेश पार्सेकर, नार्वेचे ग्रामस्थ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT