Shigmo Parade  Dainik Gomantak
गोवा

Shigmo Parade : 'घणचे कटर घण'चा निनाद; डिचोलीत शिगमोत्सव उत्साहात

आकर्षक चित्ररथ, रोमट आणि लोकनृत्याचा अविष्कार तसेच हजारो लोकांच्या उपस्थितीत शुक्रवारी डिचोलीत शिगमोत्सव मिरवणूक प्रचंड उत्साहात पार पडली.

दैनिक गोमन्तक

Shigmo Parade : आकर्षक चित्ररथ, रोमट आणि लोकनृत्याचा अविष्कार तसेच हजारो लोकांच्या उपस्थितीत शुक्रवारी डिचोलीत शिगमोत्सव मिरवणूक प्रचंड उत्साहात पार पडली. आकर्षक चित्ररथ आणि शिगम्याचा अविष्कार पाहण्यासाठी शहरात प्रचंड गर्दी उसळली होती.

संपूर्ण शहर शिगम्याच्या वातावरणात न्हावून आणि 'ओस्सय, ओस्सय' तसेच 'घणचे कटर घण'च्या निनादात दुमदुमून गेले होते. गोवा पर्यटन खाते आणि पर्यटन विकास महामंडळ यांच्या सहकार्याने डिचोली शिगमोत्सव समितीतर्फे या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

थाटात उद्घाटन

शांतादुर्गा विद्यालयाच्या प्रांगणात प्रमुख पाहूणे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते शिगमोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खास अतिथी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, डिचोलीचे नगराध्यक्ष पुंडलिक फळारी, पालिकेचे मुख्याधिकारी सचिन देसाई, नगरसेवक अनिकेत शिगमोत्सव समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

बोर्डेतून मिरवणुकीला प्रारंभ

बोर्डे वडाकडून श्री वडेश्वर देवाच्या प्रांगणातून शिगमोत्सव मिरवणूकीला प्रारंभ झाला. भायली पेटमार्गे छत्रपती शिवाजी महाराज सर्कल आणि मैदानाकडून कदंब बसस्थानकावर आल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीत सहभागी पुराणकालीन कथावर आधारीत आकर्षक चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

रोमटामेळ आणि लोकनृत्यांचा अविष्कार तसेच विविध वेशभूषा केलेले कलाकार, यामुळे शिगमोत्सव मिरवणुकीचे वातावरण फुलून गेले होते. बोर्डे, भायलीपेट आदी मिरवणुकीच्या मार्गाच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती. रात्रीपर्यंत मिरवणुकीचा जल्लोष सुरु होता. पोलिस कायदा सुव्यवस्था आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवून होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

SCROLL FOR NEXT