Leopard Dainik Gomantak
गोवा

Leopard Attack: शिगावात रात्री बिबट्याची दहशत, कुत्र्यांचा पाडला फडशा; वनअधिकाऱ्यांनी केली पाहणी

Leopard In Goa: वन खात्याचे अधिकारी सचिन सावंत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही या भागाची बारकाईने पाहणी केली आहे.शिकाराच्या शोधात भटकत तो गावात पोचला असण्याची शक्यता आहे.

Sameer Panditrao

फोंडा: शिगाव तुरीमरड येथील गावात बिबट्याचा हैदोस चालू असून अनेक पाळीव कुत्र्यांना त्याने फस्त केले आहे. शिगाव नागरीकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून बिबटा रात्रीचा गावात येऊन पाळीव कुत्र्यांना फस्त करीत आहे.

सत्यवान खेडेकर, रुपेश प्रभू, शशिकांत वेळीप तसेच वाड्यावरील अन्य रहिवाशांच्या कुत्र्यांना त्याने पळवून नेऊन त्यांचा फडशा पाडला आहे. या संदर्भात वन खात्याच्या कुळे कार्यालयाला कळविले तेव्हा वन अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन या भागात पाहणी केली आहे.

या संदर्भात वन खात्याचे अधिकारी सचिन सावंत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही या भागाची बारकाईने पाहणी केली आहे.शिकाराच्या शोधात भटकत तो गावात पोचला असण्याची शक्यता आहे. आम्ही सीसीटीव्ही मोशन कॅमेरा बसवून त्याचे निरीक्षण करणार आहे. पुढील कारवाई ज्येष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली होईल.

शिवोली आगरवाडा येथे एका विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला होता. हरमल येथील असफ निकोलस (वय २४ वर्षे) हा युवक गोव्यातील एका नामांकित हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.

बुधवारी रात्री तो स्कूटरवरून चोपडेहून आपल्या घरी हरमलला परतत होता. दरम्यान, आगरवाडा भागातील एका चढणीवर असलेल्या हॉटेलजवळ पोहचताच अचानक एका बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT