Goa Shigmotsav  Dainik Gomantak
गोवा

शिगमोत्सवाची परेड पारंपरिक मार्गानेच, स्मार्ट सिटीच्या कामांमुळे अडचण होणार नाही! महापौरांचा विश्वास

परेड 11 मार्च रोजी पारंपारिक मार्गाने म्हणजेच '18 जून रोड'वर होणार

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील कार्निव्हल पार पडल्यानंतर गोमंतकीयांना वेध लागतात ते शिगमोत्सवाचे. गोव्यातील कोणत्या शहरात कधी शिगमोत्सव साजरा होणार यांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मेळे, मिरवणुकीत सहभागी होणारे चित्ररथ यांची धावपळ सुरु झालेली आपल्याला पाहायला मिळाली.

बहुचर्चित अशा पणजी शिगमोत्सवाची परेड कधी होणार याबाबत बरीच उत्सुकता लागून राहिली होती. मात्र याविषयी एक महत्वाची माहिती समोर येतेय.

Goa Shigmotsav

पणजी शिगमोत्सव परेड 11 मार्च रोजी पारंपारिक मार्गाने म्हणजेच '18 जून रोड'वर होणार आहे. पणजीत सध्या स्मार्ट सिटीचे काम सुरु आहे. मात्र असे असूनही शहरवासीयांच्या कामकाजावर कोणताही परिणाम न होता सर्व व्यवहार सुरळीत असल्याचे पणजीचे महापौर रोहित मॉन्सेरात यांनी म्हटले आहे.

तसेच शिगमोत्सवाच्या परेड बाबत आणखी माहिती हाती येतेय ती अशी की, शिगमोत्सवाच्या मिरवणुकीसाठी तसेच चित्ररथांच्या सादरीकरणासाठी रोषणाई आवश्यक असल्याने परेड संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल, तसेच ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री 10 परेड थांबवण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. पणजी शिगमोत्सव 7 मार्च रोजी होळी पलटवार उत्सवाने सुरू होईल आणि 12 मार्च रोजी संपेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

SCROLL FOR NEXT