Goa Shack Policy Dainik Gomantak
गोवा

Goa Beach Shack Policy: नव्या शॅक धोरणात बदल करा अथवा जुने धोरण कायम ठेवा; शॅक मालकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Goa Beach Shack Policy: मुख्यमंत्री व आमदार लोबोंची शॅक मालकांनी भेट घेतली.

Rajat Sawant

Shack Owners Meet CM And MLA Lobo Over Goa Shack Policy 2023: गोव्यातील शॅक मालकांनी सोमवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत व कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांची पर्वरीतील मंत्रालय येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी नवीन 2023च्या गोवा शॅक धोरणावर चर्चा केली. यावेळी नवीन धोरण दुरुस्त करा अथवा जुने शॅक धोरण कायम ठेवा अशी मागणी शॅक मालकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

नवे शॅक धोरण जाहीर झाल्यानंतर शॅक मालकांमध्ये नाराजी पसरली होती. शॅक्स वितरणात सुसूत्रता यावी आणि हे शॅक्स व्यवस्थित चालावेत यासाठी पर्यटन खाते लवकरच नवीन बीच शॅक धोरण मंजूर केले. त्यामुळे परस्पर त्रयस्थाला शॅक भाड्याने देणे शक्य होणार नाही.

या नव्या धोरणात विविध परवाना शुल्कांत 10 टक्के वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला. तसेच शॅक परवान्यासाठी अर्ज करणारा अर्जदार हा 18 ते 60 वयोगटातीलच असावा, अशीही अट घालण्यात आली होती. 

दरम्यान गोव्याच्या किनारपट्टी भागातील वेंझी व्हिएगस, जीत आरोलकर, आलेक्स सिक्वेरा,मायकल लोबो या चार आमदारांनी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या समवेत बैठक घेवून या अटीविषयी चर्चा केली.

आमदारांशी चर्चेनंतर व शॅक मालकांच्या विनंतीचा विचार करून 60 वयोमर्यादेचा निकष नव्या धोरणातून वगळण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT