Fish Market Goa Dainik Gomantak
गोवा

Fish Market Goa: उद्‌घाटनाआधीच मासळी विक्रीला सुरुवात! नव्या 'SGPDA' मासळी मार्केटमध्ये अस्वच्छतेचं साम्राज्य

Fish Market: एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटमध्ये नवीन इमारत बांधून पूर्ण झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटमध्ये नवीन इमारत बांधून पूर्ण झाली आहे. कोल्ड स्टोरेज नसल्यामुळे व इतर काही बारीकसारीक गोष्टी पूर्ण न झाल्याने या इमारतीचे उद्‌घाटन रखडले आहे. मात्र, इमारतीचे उद्‌घाटन होण्यापूर्वीच तिथे मासळी विक्री सुरू झाल्याचे दिसून येत आहे व त्यामुळे सर्वत्र अस्वच्छतेचे सम्राज्य पसरले आहे.

पहाटे वाहनातून जी मासळी येते ती या इमारतीत उतरविण्याचे काम सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचे पुरावे म्हणजे त्या जागेत मासळीचे पाणी पसरले आहे. प्लास्टिक, प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे तुकडे पडलेले आढळतात. नाले प्लास्टिक, बाटल्या व इतर कचऱ्याने भरलेले आढळतात.

तिथून जवळच साळ नदीच्या पाण्याचा प्रवाह वाहत आहे, तिथे थर्माकॉलचे तुकडे पडलेले आढळतात. या सर्व प्रकाराबद्दल नागरिक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. ‘एसजीपीडीए’ने येथे व्यवहार करण्यास मान्यता तर दिली नाही ना, अशी शंका नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत.

विजय सरदेसाईंनी वेधले लक्ष!

नवीन इमारतीचे उद्‌घाटन जानेवारी महिन्यात करण्याचा बेत होता; पण नंतर फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी अपूर्णावस्थेत असलेल्या या इमारतीच्या उद्‌घाटनास आक्षेप घेतला होता.

शिवाय कोल्ड स्टोरेजची व्यवस्था नसल्याने केंद्र सरकारकडून मिळू शकणाऱ्या २० कोटी रुपयांच्या अनुदानावर पाणी सोडावे लागणार आहे, असे सरदेसाई यांनी लक्षात आणून दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT