Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, भंगारअड्डा चालक सादिक खानला अटक

Goa Crime News: मुलगी रात्री घरी परतली नसल्याने तिच्या कुटुंबियांकडून शोधाशोध केली असता दुसऱ्या दिवशी सकाळी ही मुलगी घरी आली.

Pramod Yadav

फोंडा: एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून म्हार्दोळ पोलिसांनी भोम येथील सादिक खान (वय २०) याला अटक केली आहे. संशयिताने या अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून हा प्रकार केल्याचे उघडकीस आले असून अटकेत असलेला संशयित आणि पीडिता दोघेही बिगर गोमंतकीय आहेत.

भोम येथे भंगारअड्डा चालवणाऱ्या सादिक खान याने या अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती. या मैत्रीचा फायदा उठवताना सादिक खान याने या मुलीला फूस लावून आपल्या सोबत घेतले आणि तिवरे येथील आपल्या एका मित्राच्या खोलीवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

ही मुलगी रात्री घरी परतली नसल्याने तिच्या कुटुंबियांकडून शोधाशोध केली असता दुसऱ्या दिवशी सकाळी ही मुलगी घरी आली. त्यानंतर तिच्याजवळ या प्रकाराची माहिती घेऊन पालकांनी म्हार्दोळ पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली.

गेल्या मंगळवारी हा प्रकार घडला होता, त्यानंतर फरार संशयिताच्या मुसक्या म्हार्दोळ पोलिसांनी आवळल्या आणि त्याला अटक केली. म्हार्दोळ पोलिसांनी संशयित सादिक खान याच्याविरुद्ध पोक्सो कायद्याखाली गुन्हा नोंदवला असून याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT