बार्देश : म्हापसा पालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामे रखडल्याने गटार व्यवस्था पूर्णपणे कोमडलेली आहे. कचरा व माती दगड धोंडे जे साचून राहिले आहे, ते पावसाच्या पाण्याबरोबर वाहून रस्त्यावर येत आहे.या गटारांची कामे पावसाळा सुरू असताना करण्यास सुरुवात केलेली आहे, यामुळे प्रभाग २० चे नगरसेवक सुधीर कांदोळकर यांनी नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले की, ही कामे पावसाळ्यापूर्वी व्हायला हवी होती, परंतु ती न झाल्याने ही समस्या निर्माण झालेली आहे. म्हापसा पालिका परिसरामध्ये जागोजागी गटारे तुंबून राहिल्याने सर्वत्र गटारातील घाण पाणी व साठलेला कचरा रस्त्याच्या मधोमध येऊन राहतो. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास होतो.
म्हापसा नगरपालिका २० प्रभागांची आहे. सर्व प्रभागांतील ३-३ विभाग एकत्र करून त्यांना चार लाख रुपये कामगारांसाठी दिलेले आहेत. नगरसेवकांनी त्यातून पावसाळ्यात उद्भवणारी कामे करून घ्यावीत,असे सांगितले आहे.
-प्रिया मिशाळ, नगराध्यक्षा
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.