Calangute Road Dainik Gomantak
गोवा

Calangute: सूचनांकडे दुर्लेक्ष, सांडपाणी रस्त्यावर सोडणाऱ्या हॉटेल्सना कळंगुट पंचायतीकडून तीन लाखांचा दंड

Calangute Panchayat: हॉटेलधारक नाले आणि रस्त्यावर सांडपाणी सोडत असल्याचे आढळून आले.

Pramod Yadav

रस्त्यावर सांडपाणी सोडल्याप्रकरणी कळंगुट पंचायतीने तीन हॉटेलांना दंड ठोठावला. प्रत्येक हॉटेलला एक लाख रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी शुक्रवारी (२६ जुलै) पत्रकारांशी बोलताना दिली.

हॉटेलधारक नाले आणि रस्त्यावर सांडपाणी सोडत असल्याचे आढळून आले. पावसाच्या पाण्यासह सर्व सांडपाणी रस्त्यावर पसरत असल्याने अस्वच्छता झालीय, अशी माहिती सरपंच सिक्वेरा यांनी दिली.

सांडपाणी नाल्याद्वारे समुद्रात जात असून, याचा कळंगुटच्या पर्यटनावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे सिक्वेरा म्हणाले.

हॉटेल्सनी दंड भरला नाही तर त्यांचे व्यापार परवाने रद्द केले जातील आणि पंचायत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कारवाईसाठी पत्र लिहेले जाईल, असेही सरपंच सिक्वेरा म्हणाले.

सुरुवातीला दंडाची रक्कम पंचवीस हजार रुपये होती. सांडपाणी रस्त्यांवर सोडले जाऊ नये याबाबत व्यावसायिकांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी दंडाची रक्कम एक लाख रुपये करण्यात आलीय.

रस्त्यावर सांडपाणी सोडले जाऊ नये याबाबत अनेकवेळा सूचना करुनही हॉटेलधारक रस्त्यावर सांडपाणी सोडतात, असे सरपंच सक्वेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT