Sewage problem in Margao  Dainik Gomantak 
गोवा

मडगावात सांडपाण्याची समस्या ‘जैसे थे’

मलनिस्सारण वाहिनीशी शहर न जोडल्याने अजूनही अडचणी सुरूच

दैनिक गोमन्तक

मडगाव: किरकोळ भाग सोडला तर मडगावात मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे तयार झालेले असले तरी अनेक निवासी व व्यापारी संकुले या योजनेला जोडली गेलेली नाहीत. त्यांचे मलमूत्र व सांडपाणी गटारे व नाल्यात जाण्याचे प्रकार सुरूच असल्याचे नगरपालिकेने हल्लीच केलेल्या तपासणीत आढळून आले आहे.

2009 मध्ये केलेल्या तपासणीचे निष्कर्ष व आताचे निष्कर्ष यात तसा कोणताच फरक नसल्याचे ही संयुक्त पहाणी म्हणते. मडगाव पालिकेच्या तपासणीत सोळा आस्थापने सांडपाणी व मलमूत्र नाल्यात सोडत असल्याचे आढळले आहे. सीवेज जोडण्या न घेतलेल्यांची काही चूक नाही तर जोडण्यांसाठी रस्ता तोडण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याकडून न मिळालेली परवानगी आहे.

मलनिस्सारण महामंडळ सूत्रांच्या म्हणण्याप्रमाणे कोलमरड, आके येथील किरकोळ बाबी वगळता 90 टक्के भागात वाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. पण, त्या भागातील जोडण्या झालेल्या नाहीत व त्यातूनच समस्या निर्माण होतात. नगरपालिकेने अशांना नोटिसा बजावलेल्या असल्या तरी त्याचा परिणाम दिसून आलेला नाही.

महामंडळाने त्यासाठी नगरपालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाला अशा आस्थापनांचे परवाने नूतनीकरण करू नयेत असा प्रस्ताव सादर केला आहे. तरीही प्रतिसाद न मिळाल्यास सरकारकडे जोडण्यासक्तीची विनंती केली जाईल, अशी माहिती मलनिस्सारण महामंडळाच्या सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT