Sewage from Mhapsa Hospital on the road In Goa Dainik Gomantak
गोवा

म्हापसा इस्पितळाचे सांडपाणी रस्त्यावर!

राज्य सरकारच्या एकंदर कार्यपद्धतीबाबत काँग्रेसचे नेते संजय बर्डे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: गोवा सरकारच्या म्हापसा येथील जिल्हा इस्पितळाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी सध्या रस्त्यावर येत असल्याने या इस्पितळात येणाऱ्या रुग्णांच्या तसेच त्यांच्यासमवेत येणाऱ्यांच्या स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होणार आहे, असे नमूद करून राज्य सरकारच्या एकंदर कार्यपद्धतीबाबत काँग्रेसचे नेते संजय बर्डे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Sewage from Mhapsa Hospital on the road In Goa)

मुख्य रस्त्यावरून प्रवेशद्वारातून इस्पितळात जाताना डाव्या बाजूने गटार दृष्टीस पडते. तिथे एक छोटेखानी उद्यान उभारण्यात आले असून, गटारातील सांडपाणी त्या उद्यानातील झाडांना सोडले जाते. मात्र त्या गटारातील पाणी तिथे तुंबून बऱ्याचदा रस्त्यावरूनही वाहत असते. ते रसायनयुक्त सांडपाणी उद्यानातील झाडांनाही धोकादायक आहे. सध्या कोविडमुळे (Covid-19) बहुतांश लोक तोंडावर मास्क परिधान करीत असल्याने त्या दुर्गंधीचा तेवढासा परिणाम लोकांना जाणवत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

गटारातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याबाबत इस्पितळाच्या व्यवस्थापनाचे कोणतेही नियोजन दिसून येत नाही. सरकार याबाबत कोणती तरी विधायक कृती करेल यावर आम्हाला विश्वासही नाही. त्यामुळे, आता आरोग्य सचिवांनी यासंदर्भात कारवाई करून आम जनतेला रोगराईपासू दूर ठेवावे, असे यासंदर्भात बोलताना म्हापसा येथील एक नागरिक सीतेश मोरे म्हणाले.

इस्पितळातील टाइल्स विस्कळीत

या इस्पितळाच्या एकंदर दयनीय परिस्थितीविषयी बोलताना काँग्रेसचे नेता संजय बर्डे म्हणाले, की इस्पितळाच्या (Goa Hospital) इमारतीच्या पायऱ्या काही ठिकाणी मोडकळीस आलेल्या आहेत. तेथील टाइल्स विस्कळीत झालेल्या आहेत. निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्यानेच ही परिस्थिती उद्‍भवलेली आहे. रायबंदर येथील पोर्तुगीजकालीन इस्पितळाची इमारत अजूनही सर्वच बाबतींत शाबूत आहे. परंतु, हल्ली राज्य सरकारने केलेल्या बांधकामांचा दर्जा अतिशय खालावलेला आहे, असेही श्री. बर्डे म्हणाले.

इस्पितळाच्या इमारतीला पाण्याच्या गळतीचा त्रास होत असल्याने अलीकडेच इस्पितळाच्या टॅरेसवर फ्रब्रिकेशन वर्क करून तिथे लोखंडी चॅनेल बसवण्यात आले आहेत. लवकरच तिथे पत्र्यांची शेड उभारली जाणार आहे. तथापि, तिथे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम चाललेले आहे व त्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंतेही लक्ष देत नाहीत.

- संजय बर्डे, (काँग्रेस नेता, म्हापसा)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT